आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aam Aadmi Party Candidates List News In Marathi, Delhi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिली यादी: मेधा पाटकर मुंबईत, गडकरींविरुद्ध दमानिया तर मोदींविरुद्ध केजरीवाल?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आम आदमी पार्टीने (आप) लोकसभा निवडणुकीसाठी 20 उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील सहा उमेदवार आहेत. ईशान्य मुंबईत संजय दीना पाटील यांच्याविरुद्ध सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, तर नागपुरात भाजप नेते नितीन गडकरी यांच्याविरुद्ध आपच्या प्रदेश समन्वयक अंजली दमानिया मैदानात उतरणार आहेत. याशिवाय काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध अमेठीत कुमार विश्वास, चांदनी चौकमधून दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांच्याविरोधात आशुतोष यांना तिकीट मिळाले आहे. योगेंद्र यादव गुडगावातून निवडणूक लढवणार आहेत.

दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावरून अरविंद केजरीवाल पायउतार झाल्यानंतर दोनच दिवसांत ही यादी जाहीर करण्यात आली. त्यात पुण्यात सुभाष वारे, वायव्य मुंबईत गुरुदास कामत यांच्याविरुद्ध मयंक गांधी, मुंबई दक्षिणमध्ये केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्याविरुद्ध मीरा सन्याल आहेत. नाशकात विजय पांढरे यांना उमेदवारी मिळाली आहे. याशिवाय दिल्लीतील दोन, उत्तर प्रदेश सात, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, मध्य प्रदेश व पंजाबच्या प्रत्येक एका उमेदवाराची घोषणा करण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरोधात रायबरेलीमध्ये अद्याप आपने उमेदवार दिलेला नाही. प्रामाणिक लोकांना संसदेत पाठवणे हा आमचा हेतू आहे. गुन्हेगार किंवा घराणेशाहीची परंपरा असलेल्यांना पाठवू इच्छित नाही. इतर राज्यांसाठीही उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष शिसोदिया यांनी सांगितले. दमानिया यांना गडकरींविरुद्ध उमेदवारी मिळाल्याने नागपुरातील लढत रंगणार आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, लोकसभा लढवायची म्हणून पद सोडले नाही : केजरीवाल