आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aam Aadmi Party Expelled Two Workers Latest News

भ्रष्‍टाचाराच्या आरोपावरून \'आप\'मधून दोन नेत्यांची केजरीवाल यांनी केली हकालपट्टी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- देगणीच्या बदल्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याच्या मुद्यावरून वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या आम आदमी पक्षाने (आप) आज (शुक्रवार) पक्षातील दोन नेत्यांची हकालपट्टी केली. हरदोई जिल्ह्याचे कोषाध्यक्ष अशोक कुमार आणि अवधचे संयोजक अरुणासिंह पैसे घेऊन उमेदवारी दिल्याप्रकरणी दोषी आढळून आले आहेत. त्यामुळे दोघांना बाहेरचा रस्ता दाखविण्‍यात आल्याचे 'आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

'आप'मध्ये देणगीच्या बदल्यात उमेदवारी दिली जात नसल्याचे केजरीवाल यांनी यावेळी स्पष्‍ट केले. परंतु , 'आप'मध्ये पैसे घेऊन उमेदवारी कोणी देत असेल तर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असाही इशारा केजरीवाल यांनी दिला.

एका व्यक्तीने उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षाला 40 कोटी रुपयांची देणगी देण्याचे वृत्त सपशेल खोटे आहे. देशातून भ्रष्टाचाराचा नायनाट करण्‍याचा 'आप'चा खरा उद्देश असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, 'आप'ला गोव्यात मोठा हादरा बसला आहे. गोव्यातील परिचित चेहरा सिंगर रेमो फर्नांडिजने 'आप'ला 'रामराम' केला आहे.

राखी बिर्लांवरील आरोप निराधार...
'आप'च्या युवा नेत्या राखी बिर्ला यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप निराधार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. केजरीवाल म्हणाले, राखी बिर्ला यांची सखोल चौकशी करण्यात आली होती. राखी यांनी कोणत्याही प्रकारची लाच घेतल्याचे सिद्ध झालेले नाही. दरम्यान, 'आप' नेता महेंद्र सिंह यांनी राखी बिर्ला यांच्यावर पक्ष कार्यालयासाठी सात लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप लावला होता.

'आप'च्या कोणत्याही नेत्यांना पैसे देवू नका, असे आवाहन केजरीवाल यांनी देशातील जनतेला केले आहे. कोणी लाच मागत असेल तर त्याचे रेकॉर्डिंग करून पक्ष कार्यालयात सादर करावे. संबंधित नेता, पदाधिकारी तसेच कार्यकर्ता दोषी आढळल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, तिकीट नाकारल्याने नाराज झाले पक्ष कार्यकर्ता...