आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aam Aadmi Party Having Different Thoughts On Dharna

धरणे आंदोलनचे \'आप\'मध्ये पोस्टमॉर्टम, आता वांरवार रस्त्यावर येणार नाहीत केजरीवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीच्या धरणे आंदोलनावर विरोधकांकडून टीका सुरु असतानाच आता पक्षातील एक मोठा गटही धरणे आंदोलनाच्या विरोधात असल्याचे समोर आले आहे. आता कोणत्या मुद्यांवर रस्त्यावर उतरायचे हे ठरविले पाहिजे, असे या गटाचे म्हणणे आहे. सोमवार आणि मंगळवार दोन दिवस केजरीवाल आणि त्यांचे मंत्रिमंडळ तीन पोलिस अधिका-यांच्या निलंबनासाठी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनावर सर्वच पक्षांकडून टीका होत आहे.
'आप'च्या एका ज्येष्ठ नेत्याने इंग्रजी दैनिकाला सांगितल्यानुसार, 'सरकार विरोधी धोरणांच्या विरोधात रस्त्यावर यापुढेही येत राहाणार आहे. मात्र यापुढे असे वारंवार होणार नाही.' तसेच, काहींचे म्हणणे आहे, की यापुढे कोणत्याही प्रश्नावर आंदोलन करु नये तर, पक्षाच्या जाहीरनाम्यातील मुद्यांवरच रस्त्यावर उतरले पाहिजे.
'आप'ली स्टाइल सोडणार नाही
आम आदमी पार्टीचे (आप) राजकीय सल्लागार समितीतील सदस्य आणि पक्षाचे एक ज्येष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की 'आप'चे सरकार हे पारंपरिक सरकार सारखे नाही. आम्ही आमची स्टाइल सोडणार नाही. मात्र, हे देखील सांगू इच्छितो की, यापुढे अशी आंदोलने वारंवार होणार नाहीत.
माध्यमांमध्ये नकारात्मक प्रतिक्रिया आल्यानंतरही रल्वे भवन समोरील आंदोलनाबद्दल पक्षाला खेद नसल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.

पुढील स्लाइडमध्ये, धरणे आंदोलनाला उच्चभ्रूंची नापसंती