आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम आदमी पक्षाची गुजरात निवडणूक लढण्याची घोषणा, 17 सप्टेंबरला प्रचाराची सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पक्षाने गुजरात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती देताना पक्षाचे गुजरात प्रभारी गोपाल राय म्हणाले की, पक्षाने 'गुजरात नो संकल्प' नावाने आपले निवडणूक अभियानाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. 
पक्षाने 17 सप्टेंबर रोजी अहमदाबादेत एका रोड शोचे आयोजन केले आहे. याच रोड शोमधून प्रचाराची औपचारिक सुरुवात करणार आहे.
गोपाल राय म्हणाले, राज्यात अनेक वर्षांपासून भाजपचे राज्य आहे, परंतु गुजरातच्या जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. सरकारकडून ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण झाल्या नाहीत. काँग्रेस दुभंगलेली आहे. अशा वेळी गुजरातच्या जनतेला सक्षम पर्याय हवा आहे जो आम आदमी पक्ष देणार आहे.
तथापि, गोपाल यांना पक्ष सर्व 182 जागांवर उमेदवार उभे करणार का, असे विचारले असता ते म्हणाले की, जसजशी आमची संघटना तयार होईल आणि चांगले उमेदवार मिळत जातील, तिथे तिथे पक्ष निवडणूक लढवणार आहे.
बातम्या आणखी आहेत...