आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aam Aadmi Party\'s Second List For Lok Sabha Polls: Rakhi Birla May Get Ticket

\'आप\'चा यु-टर्न, राखी बिर्लाला मिळणार उमेदवारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- 'आम आदमी पक्षाने (आप) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता दुसरी यादी तयार केली आहे. 'आप'ची ही यादी लवकरच जाहीर होणार आहे. 'आप'ने आधी तयार केलेला प्लान बदलला असून आमदार राखी बिर्ला यांना उत्‍तर-पश्चिमी दिल्लीतून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर 'आप'मध्ये प्रवेश केलेले पंजाबी गायक रबी शेरगिल हे अमृतसरमधून निवडणूक लढविणार आहेत.

दरम्यान, दिल्लीतील कोणत्याही आमदाराला लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली जाणार नसल्याचे 'आप'ने यापूर्वी जाहीर केले होते. परंतु, आमदार राखी बिर्ला यांना उमेदवारी देऊन 'आप'ने यु-टर्न घेतला आहे. 'आप'च्या या रणनीतीवर टीका करणारे आमदार विनोद कुमार बिन्‍नी यांनी बंडखोरी केली आहे.

'आप'च्या दुसर्‍या यादीत एकूण 27 उमेदवारांची नावे असतील. विशेष म्हणजे 'आप'चे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि संजय सिंह लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.

सूत्रांनुसार, आदर्श शास्त्री (लखनऊ), संजीव सिंह (बनारस), केपी यादव (जौनपूर), राजेश यादव (आजमगड), ब्रिज भूषण दुबे (गाजीपूर), इलियास आजमी (लखीमपूर) आणि मसूक उस्मानी (गोंडा) निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अशोक जैन यांना कोटा आणि अतुल भाई यांना जूनागड येथून निवडणूक लढविण्‍यासाठी तयार केले जात आहे. अतुल भाई गुजरातमधील जूनागड येथून डीनू सोलंकी यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहे.

यापूर्वी 'आप'ने 16 फेब्रुवारीला 20 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यात दिल्‍लीतील चांदनी चौक मतदार संघातून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेता कपिल सिब्‍बल यांच्या विरोधात ज्येष्ठ पत्रकार आशुतोष यांना निवडणुकीच्या रिंगणात उतर‍वले जाणार असल्याची घोषणा केली होती.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, केजरीवाल, सिसोदिया आणि संजय सिंह का नाही लढणार लोकसभा?