आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम आदमी पार्टीच्या पोस्टरवर काँग्रेस संतप्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेसने आम आदमी पार्टीचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर हीन राजकरण करत असल्याचा आरोप केला आहे.‘आप’च्या कार्यकर्त्यांनी राजधानीत विविध ठिकाणी एक पोस्टर लावले असून त्यात दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना टार्गेट करण्यात आले आहे. पक्षाच्या प्रवक्त्या रेणुका चौधरी यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल आणि त्यांचा पक्ष अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करत आहे. आप पक्षाने दिल्लीत पोस्टर्स लावले असून त्यावर ‘ बेइमानांना मते द्याल तर महिलांवर अत्याचार सुरूच राहतील’ अशी टीका केली आहे.