आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aam Admi Party Arvind Kejriwal Mukesh Ambani Yogendra Yadav Latest News In Hindi

उद्योगपती मुकेश अंबानींबाबत \'आप\'च्या नेत्यांमध्ये मतभिन्नता; देणगीला हरकत नाही!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करणार्‍या आम आदमी पक्षातील (आप) नेत्यांमधील मतभिन्नता समोर आली आहे. मुकेश अंबानी हे केंद्र सरकार चालवत असल्याचा आरोप आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला असताना अंबानींकडून पक्षाला देणगी मिळाली तर काहीच हरकत नसल्याचे आपचे प्रवक्ता योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे. यादव यांच्या खळबळजनक वक्तव्याने नव्या वादाला तोंड फोडले आहे.

योगेंद्र यादव म्हणाले, मुकेश अंबानी यांची इच्छा असेल तर ते 'आप'ला देणगी देऊ शकतात. मात्र, याबाबत अंबानीच्या देणगीलाही सामान्‍य प्रक्रिया लागू असेल. अंबानी जर दहा लाख रुपयांपेक्षा कमी देणगी देत असतील तर मुंबईचे आपचे पदाधिकारी ते रोख अथवा चेकने स्वीकारतील. मात्र, देणगीची रक्कम जास्त असेल तर पक्षाची 'पीएसी' त्यावर निर्णय घेईल. यादव यांनी केलेले वक्तव्य 'आप'च्या अडचणी वाढविणारे आहे.

दिलीप पांडे म्हणाले, आपला कोणताही व्यक्ती ऑनलाइन देणगी देऊ शकतो. मात्र, देणगीचे रुपये 'क्लीन मनी' असावे. मात्र, आप ज्या व्यक्तीच्या विरोधात आंदोलन करत असेल तर त्याच्याकडून देणगी स्विकारता येणार नाही.

दरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली व रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्यामधील संगनमतामुळे दिल्लीमध्ये नैसर्गिक वायुची किंमत जाणीवपूर्वक वाढविण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप गेल्या काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांनी केला होता. एवढेच नाही तर रिलायन्स कंपनीने दिल्लीत व देशामध्ये वायुचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्याचे वक्‍तव्यही केजरीवाल यांनी यावेळी केले होते. यासंदर्भात चार लोकांनी तक्रार दाखल केल्या असून रिलायन्सच्या नफेखोरीमुळे देशामध्ये महागाई वाढत असल्याचे मत केजरीवाल यांनी व्यक्त केले होते.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, 'आप'ने घेतले 'फोर्ड फाउंडेशन'कडून रुपये; भाजपचा आरोप