आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - दिल्ली सरकारच्या पाणी व विज बिल दरवाढीच्या विरोधात आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सुरू केलेल्या उपोषणाला मंगळवारी 11 दिवस झाले. त्यानंतर आता त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार कार्यकर्ते नागरिकांना एकत्र करतील तसेच दरवाढी विरोधात त्यांच्याकडून शपथपत्रेही भरून घेतील. ही शपथपत्रे मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना दिली जाणार आहेत, असे केजरीवाल यांनी सांगितले. आतापर्यंत आठ लाख लोकांनी शपथपत्रे भरली आहेत.
केजरीवाल यांची तब्येत दिवसेंदिवस खालवत चालली आहे. आतापर्यत 'आम आदमी'ने आठ लाख शपथपत्रे भरून घेतली आहेत. ही सर्व शपथपत्रे घेऊन मनिष सिसोदिया, संजय सिंह, गोपाल राय आणि कुमार विश्वास यांच्यासह अनेक कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाकडे निघाले होते. परंतु पोलिसांनी त्यांना भैरव रोडवरच अडवले. सिसोदिया यांनी पोलिसांना सांगितले की, आम्ही सर्व मुख्यमंत्र्यांना भेटण्यास जात आहोत. मात्र पोलिसांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तरीही पोलिसांना चुकवून काही कार्यकर्ते मुख्यमंत्री निवासाजवळ पोहोचले. तिथे चोख सुरक्षाव्यवस्था असल्याने त्यांचा प्रयत्न फसला.
कुमार विश्वास म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला हजाराहून जास्त लोकांना बोलवले जाते. मग या कार्यकर्त्यांच्या समस्या का ऐकल्या जात नाहीत? आम्हाला वाटते की मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक वॉर्डातील नगरसेवकाला भेटावे. आमचे म्हणणे मान्य केले नाही तर आम्ही दुस-या पर्यायाचा विचार करू. दरम्यान, पोलिसांनी मुख्यमंत्री निवासाजवळ पोहोचलेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.