आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AAP आमदार मनोज कुमार यांच्यावर 420चा गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ऐतिहासिक विजयासह सत्तेत आलेल्या आपच्या आमदारांमागे लागलेले शुक्लकाष्ट काही संपण्याचे नाव घेत नाही. आता पुन्हा एकदा आपच्या आमदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी आमदार महोदयांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे.

आम आदमी पार्टीचे आमदार मनोज कुमार यांना फसवणुकीच्या आरोपात ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्लीतील कोंडली येथून ते विजयी झाले आहेत. पोलिस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी सांगितले, की भूखंड व्यवहाराच्या जून्या प्रकरणात त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

मनोज कुमार यांच्याविरोधात फसवणूक, सुरक्षा रक्षकांना चिथावणी देणे आणि महिलांसोबत गैरवर्तन अशा इतर आरोपात चार एफआयआर दाखल आहेत. याआधी आपचे कायदा मंत्री जितेंद्रसिंह तोमर यांना बनावट डिग्री प्रकरणी अटक झाली आहे. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांच्यावर पत्नीने मारहाण केल्याचा आरोप केला होता.
बातम्या आणखी आहेत...