आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aam Admi Party Professional Candidates From Iit And Military

Ex कमांडो ते IIT पासआऊट, AAP ने जनतेसमोर ठेवले प्रोफेशनल उमेदवारांचे पर्याय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - माजी कमांडो सुरेन्द्र कुमार सलमान खानबरोबर. - Divya Marathi
फोटो - माजी कमांडो सुरेन्द्र कुमार सलमान खानबरोबर.
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीने पुन्हा एकदा सुमारे डझनभराहून अधिक प्रोफेशनल्सना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे. देशातील सर्वात नामंकित शिक्षण संस्था IIT पासआऊट ते थेट लष्करातील निवृत्त अधिकार्‍यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर वकील आणि पत्रकारही रणांगणात उतरले आहेत. त्यामुळे पक्षाची प्रतिमा पुन्हा उंचावली आहे. पार्टीचे स्टार प्रचारक आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अरविंद केजरीवाल स्वतः IIT पास आऊट आहेत. तसेच भारतीय महसूल सेवेचे माजी अधिकारीही आहेत.
त्याशिवाय मालवीय नगरमधील आपचे उमेदवार सोमनाथ भारती हेही IIT पास आहेत तसेच ते वकीलही आहेत. त्यांच्याशिवाय पार्टीने विश्वासनगर मतदारसंघातून डॉक्टर अतुल गुप्ता यांना मैदानात उतरवले आहे. आपच्या उमेदवारांचे सरासरी वय 40 आहे.

माजी लष्करी अधिकारी
पक्षाने बिजवासनमधून सेवानिवृत्त कर्नल देवेन्द्र सिंह सहरावत यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याशिवाय दिल्ली कँटमधून माजी कमांडो सुरेन्द्र कुमारही मैदानात आहे.
पत्रकारांचाही समावेश
पक्षाने अनेक ज्येष्ठ पत्रकारांनाही मैदानात उतरवले आहे. सध्या पटपडगंजमधून पूर्वाश्रमीचे पत्रकार मनीष शिसोदिया, मंगोलपुरीमधून राखी बिडलान, राजोरी गार्डनमधून जरनैल सिंह मैदानात आहेत.

हे वकीलही रणांगणात
मालवीय नगरचे उमेदवार सोमनाथ भारती, ग्रेटर कैलाशमधील सौरभ भारद्वाज आणि कस्तुरबा नगरचे मदन लाल, रोहिणीचे अॅड. चरणजी लाल गुप्ता यांच्यासह एलएलबी पदवीधारक संजीव झा यांना उमेदवारी दिली आहे.

इंजिनिअर आणि उद्योगपतीही यादीत
आम आदमी पार्टीने तिमारपूरमधून एक प्राध्यापक पंकज पुष्कर, जंगपुरामधून इंजिनिअर प्रवीण कुमार आणि अनेक उद्योगपतींना तिकिट दिले आहे.

पुढे पाहा, कोण कोण आहेत आपचे उमेदवार...