आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

AAP चा इलेक्शन फंडा, मेट्रोमध्ये फिरताहेत स्टार प्रचारक, रस्त्यांवर ऐकवत आहेत गाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकांसंदर्भात जे अंदाज समोर येत आहेत त्याचा विचार करता आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल शर्यतीत पुढे असल्याचे चित्र आहे. या सर्वेक्षणांनंतर आपचा उत्साह अधिक वाढला असून आपने प्रचारात आणखी परिश्रम घेण्यास सुरुवात केली आहे. आपची प्रचाराची पद्धतही इतर पक्षांच्या तुलनेत अत्यंत वेगळी आहे.

आपने या निवडणुकांसाठी एक वॉर रूम तयार केली आहे. त्यात प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. दररोज प्रचारासंदर्भात रणनीती आखून काम केले जात आहे. गुरुवारी सायंकाळी प्रचार थांबेल. आपच्या प्रचाराची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. पक्षाचे कार्यकर्ते दिल्लीत जागोजागी बॅनर घेऊन उभे असलेले दिसत आहेत. कोणी रस्त्यावर फिरून मते मागत आहे तर कोणी सोशल साईट्सवर "मफलर मॅन' कॅम्पेन चालवत आहेत.

"आप'चे कार्यकर्ते अत्यंत वेगळ्या पद्धतीने प्रचारात व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री गुल पनाग यांनी एका बाइक रॅलीद्वारे प्रचार केला. तसेच मेट्रोमध्ये फिरूनही गुल पनाग प्रचार करत आहेत. गायक विशालही रस्त्यांवर गाणी सादर करून पक्षाचा प्रचार करत आहे. पक्षाच्या विविध उमेदवारांच्या मतदारसंघात रॉक कॉन्सर्टद्वारे विशाल प्रचार करत आहे.

स्टार प्रचारकांची मदत
आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याशिवाय पक्षाचे दुसरे स्टार प्रचारक त्यांचे जुने सहकारी आणि माजी मंत्री मनीष शिसोदिया आहेत. केजरीवाल यांच्या टीममध्ये बॉलीवूडचे चार चेहरे आहेत. त्यात संगीतकार विशाल डडलानी आणि रघु राम, अभिनेत्री गुल पनाग आणि अभिनेता जावेद जाफरी यांचा समावेश आहे.
पुढील स्लाइडवर पाहा प्रचाराचे काही PHOTO