आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमीर देशद्रोहीच, त्‍याला हटवले ते चांगले केले; भाजप खासदाराचे विधान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पर्यटन विभागाच्‍या 'अतुल्य भारत' या महत्त्वाकांक्षी मोहिमेच्‍या ब्रँड अॅम्‍बेसिडरपदावरून अ‍मीर खानला काढण्‍यात आले. या मुद्दयावर शुक्रवारी संसदीय समितीच्‍या बैठकीत चर्चा झाली. खासदारांनी पर्यटन सचिवांना या बाबत उत्‍तर मागितले. दरम्‍यान, भाजप खासदार मनोज तिवारी यांनी अमीरला देशद्रोही म्‍हणत त्‍याला हटवले ते चांगले केले, असे वादग्रस्‍त मत व्‍यक्‍त केल्‍याचे वृत्‍त एका दैनिकाने प्रकाशित केले. त्‍यामुळे खळबळ उडाली आहे.
नेमके काय म्‍हटले मनोज तिवारी यांनी...
- मनोज तिवारी हे भोजपुरी चित्रपटातील अभिनेते, गायक आणि संगीतकारही आहेत.
- वाहतूक, पर्यटन आणि सांस्‍कृतिक या मुद्दयावर झालेल्‍या संसदीय समितीच्‍या बैठकीत विरोधकांनी अमीरच्‍या मुद्दयावर सरकारकडे उत्‍तर मागितले.
- त्‍यावर भाजप खासदार मनोज तिवारी म्‍हणाले, ''अमीर देशद्रोही आहे. त्‍याला हटवले ते चांगलेच केले.''
- दरम्‍यान, आपण असे काही बोललोच नसल्‍याचे तिवारी यांनी शनिवारी सकाळी स्‍पष्‍ट केले आणि संबंधित वृत्‍तपत्रावर कायदेशीर कारवाई करणार असल्‍याचेही सांगितले.
इतर खासदारांनी केला विरोध
- तिवारी यांच्‍या या वक्‍तव्‍याचा विरोधी पक्षातील इतर खासदारांनी विरोध केला.
- कॉंग्रेस आणि सीपीएमच्‍या खासदारांनी अमीरबाबत पर्यटन विभागाचे सचिव जुत्शी यांना उत्‍तर मागितले.
- जुत्शी म्‍हणाले, ''हा मुद्दा बैठकीच्‍या उद्दिष्‍टात नाही.''
- त्‍यावर राज्‍यसभेचे सदस्‍य असलेले के. डी. सिंह म्‍हणाले, ''मीडियामध्‍ये यावर उलट सुलट चर्चा होत आहे. त्‍यामुळे सचिवांना याचे उत्‍तर द्यावेच लागेल.''
- कॉंग्रेस खासदार शैलजा आणि के.सी. वेणुगोपाल यांनी हा मुद्दा उपस्‍थ‍ित केला.
- सीपीएम खासदार रीताब्रत बॅनर्जी यांनी दावा केला की, या मोहिमेसाठी अमीरने काहीही मानधन न घेता मोफत सेवा दिला. त्‍याच्‍या ऐवजी आता इतर कुणाकडे हे काम सोपवले तर तो किती पैसे घेईल ?
- अमीरऐवजी आता अमिताभ बच्चन यांना या पदावर नियुक्‍त केले जाणार असल्‍याची चर्चा आहे.
पंतप्रधान कार्यालयाने मागितला अहवाल
-
अमीरला या पदावरून का हटवले, या बाबत पंतप्रधान कार्यालयाने गुरुवारी पर्यटन मंत्रालयाला मुख्‍य सचिवांनी स्‍वत: अहवाल मागितला.
पुढील स्‍लाइडवर वाचा, अजून तीन वर्षे जाहिरातींमध्‍ये अमीरच झळकणार