आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan Says, Wife Kiran Wants To Leave India

असहिष्णुतेमुळे पत्नीची हाेती देश साेडून जाण्याची इच्छा : अामिरने मांडली चिंता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात वाढत्या असहिष्णुतेविरोधात आवाज उठवणाऱ्या मान्यवरांमध्ये अभिनेता आमिर खानही सहभागी झाला आहे. आमिरने देशातील असुरक्षेच्या वातावरणावर काळजी व्यक्त केली आहे. तो म्हणाला की, अनेक घटनांनी मला चिंतेत टाकले. आणि मुलांच्या सुरक्षेबाबतच्या भीतीमुळे एकदा तर पत्नीने (किरण राव) भारतच सोडून जाऊ, अशी इच्छा व्यक्त केली होती.

रामनाथ गोयंका पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात आमिर म्हणाला, एक व्यक्ती, एक नागरिक आणि या देशाचा एक भाग म्हणून आपण वर्तमानपत्रांतून वाचतो, टीव्हीवर पाहतो की काय घडतंय. निश्चितपणे मी धास्तावलेलो आहे. त्याचा इन्कार करू शकत नाही. अनेक घटनांमुळे मी चिंताक्रांत झालोय.
गेल्या सहा ते आठ महिन्यांत असुरक्षितता आणि भीतीची भावना वाढल्याचे मला जाणवते आहे. घरी मी जेव्हा पत्नी किरणसाेबत गप्पा करतो तेव्हा ती म्हणते, आपण भारतातून बाहेर निघून जावे का? किरणचे असे म्हणणे अत्यंत क्लेशकारक आणि महत्त्वाचेही आहे. तिला आमच्या मुलांची चिंता आहे. आपल्या आजूबाजूला वातावरण कसे असेल, याची भीती तिला आहे. इतकेच नव्हे तर दररोज वर्तमानपत्र उघडण्यासही ती धजावत नाही, असे आमिर म्हणाला. देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिक, लेखक, शास्त्रज्ञ व चित्रपट कलावंतांच्या भूमिकेचे आमिरने जोरदार समर्थनही केले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, आणखी काय म्‍हणाला अभिनेता आमिर खान..