आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aap, Aam Admi Party Arvind Kejriwal Arun Jaitley Bjp News

\'पॉलिटिकल तमाशा, खोटे बोलण्याचे राजकारण हेच आम आदमी पार्टीचे धोरण\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टी (आप) कार्यकर्त्यांनी आज (मंगळवार) सकाळीच भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या घरासमोर आंदोलन सुरु केले होते. दुपरी 12 वाजताच्या दरम्यान हे आंदोलन संपले आहे. आपच्या आंदोलनाची माहिती भाजप कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनीदेखील जेटलींच्या घरासमोर गर्दी करण्यास सुरवात केली होती. यामुळे भाजप विरुद्ध आपचे घोषणायुद्ध सुरु झाले. पोलिसांनी बॅरीकेड्स लावून आंदोलकांना जेटलींच्या घरामध्ये घुसण्यापासून रोखले.
खोटे बोलण्याचे राजकारण
आम आदमी पार्टीकडे धोरण नाही आणि केजरीवाल दिल्ली सरकार चालवण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे ते अशी पॉलिटिकल स्टंटबाजी करुन वेळ मारुन नेत असल्याची टीका भाजप नेत्या आणि खासदार स्मृति इराणी यांनी केली आहे.
'खोटे बोलण्याचे राजकारण' हेच आपचे धोरण असल्याचे अरुण जेटली म्हणाले आहेत. कार्यकर्ते आणि माध्यमांचे प्रतिनिधी आले, की आमचा उत्साह वाढतो, असे म्हणत त्यांनी या आंदोलनाकडे दूर्लक्ष केले.
जेटलींविरोधात आंदोलन का?
आम आदमी पार्टीचे आमदार मदनलाल यांनी सोमवारी आरोप केला होता, की त्यांना फोन करुन एकाने जेटलींना भेटण्यास सांगितले होते. आपचे नऊ आमदार फोडण्यासाठी त्यांना मुख्यमंत्री पदाच्या ऑफरसह 20 कोटींचे आमिष देण्यात आले होते. आपचे नेते संजयसिंह यांच्या उपस्थितीत आमदार मदनलाल यांनी हे आरोप केले होते. 7 डिसेंबर रोजी त्यांना फोनवरुन ही ऑफर देण्यात आली होती.
भाजप नेते अरुण जेटली आपला तोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा थेट आरोप संजयसिंह यांनी सोमवारी केला होता. त्याचबरोबर मंगळवारपासून भाजपविरोधात पोलखोल आंदोलन सुरु करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

पुढील स्लाइडमध्ये, आपच्या आरोपांवर काय म्हणाले होते जेटली आणि छायाचित्रातून पाहा जेटलींच्या घराबाहेरली धुमशान
तीन पोलिसांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन असो किंवा कॉंग्रेस-भाजपच्या नेत्यांवर केलेले भयंकर आरोप असो आम आदमी पक्ष कायम चर्चेत राहिला आहे. दिल्लीत सरकार आल्यानंतर तेथील सुधारणांकडे दुर्लक्ष करीत राजकारण करण्यात हा पक्ष गुंतलाय.... की भाजपकडून या पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय... आपले मत नोंदवा, या बातमीखाली प्रतिक्रिया द्या... किंवा आमच्या फेसबुक पेजला भेट देऊन आपली भूमिका मांडा...