आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आप आणि काँग्रेसमध्ये खोटे बोलण्याची स्पर्धा सुरू आहे- मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येथील द्वारका भागात रविवारी सभा घेतली. काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप)वर हल्लाबोल करत मोदी म्हणाले, "हे दोन्ही पक्ष दररोज सकाळी उठल्यावर आज काय खोटे बोलायचे हे ठरवतात, ज्यामुळे लोकांमध्ये खळबळ उडेल. असे वाटते की येथे खोटी आश्वासने आणि खोटे बोलण्याची स्पर्धाच सुरू आहे. या निवडणूकीत जेवढे खोटेपणाचा वापर होत आहे तेवढा आतापर्यंत कधीच झाला नाही. माध्यमात झळकून सरकार बनवता येत नाही, सरकार तर लोकांच्या मनात छाप उमटवून बनवता येते."

पुढे मोदी म्हणाले की, "दिल्लीला एका संवेदनशील सरकारची आवश्यकता आहे. दिल्लीला येथील जमिनीशी जुडलेल्या लोकांची गरज आहे. ज्या लोकांनी दिल्लीतील सामान्य लोकांचे जीवन जगले आहे अशा लोकांची दिल्लीत गरज आहे. तुम्ही आम्हाला जे दिले आहे, त्याचा विकास करून आम्हाला ते परत करायचे आहे. येथील समस्या संपवून एक विकसीत दिल्ली तुम्हाला द्यायची आहे." येथील भाषणात दिल्लीच्या जनतेला पूर्ण बहूमताची भाजप सरकार बनवण्याचे आवाहन करत मोदी म्हणाले की, या वेळी चुकूनसुध्दा अर्धवट काम करू नका. दिल्लीचे एक वर्ष निकामी गेले. यामध्ये दिल्ली पंचवीस वर्षांनी मागे पडले. दिल्लीला पुढे न्यायचे आहे. त्यासाठी भाजपाची पुर्ण बहूमताची सरकार आणायची आहे." मोदींनी दिल्लीतील झोपडपट्ट्यात राहाणार्‍यांना मजबूत घर, पाणी, वीज आणि शिक्षण अशा मुलभूत गरजा पुर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

पेट्रोल-डीझेलच्या किंमती कमी झाल्याचे श्रेय लाटले
पेट्रोल-डिझेलच्या कमी होणार्‍या किंमतीचे मोदींनी श्रेय घेत विरोधकांवर निशाणा साधला. मोदी म्हणाले, "माझ्यावर टीका टीप्पणी करणारे म्हणतात की, या मोदीचे नशीब चांगले आहे त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होत आहेत. पण मी म्हणतो जर नशीबाने पैसे वाचत असतील तर, बदनशीबांची काय गरज? जर माझ्या नशीबाने पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी झाले आहे, तर यात वाईट काय?"

सर्वच समस्यांवर विकास हाच एक उपाय
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये घसरण झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे विरोधीपक्ष या मुद्द्यावरून मोदींवर टीका करत आहेत. मोदी म्हणाले की, "माझ्या परदेशी धोरणांवर अनेकवेळा टीका झाली आहे. मात्र मला चांगल्या प्रकारे माहिती आहे की, भारताला कशा प्रकारे जागासमोर ठेवायचे, कारण मी आपल्या देशाला चांगले ओळखून आहे." मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली आणि मी सरकारसुध्दा याच मुद्द्यावर चालवत आहे. सर्वच समस्यांवर विकास हाच एक उपाय आहे, असेही ते म्हणाले.

पुढील स्लाईडवर पाहा, या सभेची इतर छायाचित्रे...