आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AAP And Kejriwal Intensifies Attack On Kiran Bedi

आपने सुरू केला किरण बेदींवर हल्ला, केजरीवाल म्हणाले, त्या तर \'पॅराशूट उमेदवार\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - केजरीवाल यांनी दारोदार जाऊन प्रचार केला.
नवी दिल्ली - 7 फेब्रुवारीला होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत वातावरण तापले आहे. सर्व पक्षांनी निवडणुकीच्या प्रचारात सर्व शक्ती पणाला लावली आहे. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी नवी दिल्ली मतदारसंघात दारोदार जावून प्रचार केला. त्यावेळी त्यांनी किरण बेदी पॅराशूट उमेदवार असल्याची टीका केली.

एका पत्रकाराने केजरीवाल यांना किरण बेदींबाबत प्रश्न विचारला त्यावेळी त्यांच्याशी स्पर्धा आहे असे वाटत नसल्याचे केजरीवाल म्हणाले. त्याचे कारण विचारण्यात आले त्यावेळी केजरीवाल म्हणाले की, 15 दिवसांपूर्वी त्यांना पॅराशूटमधून घेऊन आले आहेत. लोकांना तसे नको आहे. लोकांनी आता निर्णय पक्का केला आहे. अशा शब्दांत केजरीवाल यांनी किरण बेदींवर टीका केली.


याआधी शनिवारी केजरीवाल म्हणाले होते की, भाजप दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभूत होणार आहे. या पराभवाचे खापर कोणाच्या तरी डोक्यावर फोडता यावे म्हणून किरण बेदींना सोबत घेण्यात आले असावे. भाजपने किरण बेदींना आणले असले तरी त्या भाजपचे बुडणारे जहाज कसे वाचवणार हा प्रश्न असल्याचेही केजरीवाल म्हणाले होते.

किरण बेदींना घेरण्याची रणनीती
किरण बेदींना चहुबाजुने घेण्यासाठी आपने रणनीती आखली आहे. सार्वजनिक सभांपासून ते सोशल मीडिया सगळीकडे बेदींच्या विरोधात वक्तव्ये केली जात आहेत. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याबाबत किरण बेदी काय निर्णय घेणार असे विचारले जात आहे. कारण हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यावरील मुद्दा नाही.
पुढे पाहा, केजरीवाल यांच्या प्रचारादरम्यानचे PHOTO