आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aap Asks 10 Days To Decide On Government Formation

जबाबदारीपासून \'आप\'चा पळपुटेपणा- कॉंग्रेसचा आरोप, तरीही पाठींबा देणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍लीत 'आम आदमी पार्टी'चे सरकार स्‍थापन होण्‍याची शक्‍यता बळावली असतानाच पुन्‍हा पेच निर्माण झाला आहे. अरविंद कजेरीवाल यांनी पाठींबा घेण्‍यासाठी 18 अटींचे एक पत्र कॉंग्रेस आणि भाजपच्‍या अध्‍यक्षांना पा‍ठविले. त्‍यावर उत्तर मिळाल्‍यानंतर जनतेचे मत विचारात घेण्‍यात येईल, असे केजरीवाल यांनी सांगितले होते. कॉंग्रेसने या अटी वाचल्‍यानंतर पाठींबा देण्‍याची तयारी दर्शविली आहे. परंतु, 'आप' जबाबदारीपासून पळत असल्‍याचा आरोपही कॉंग्रेसने केला आहे.

कॉंग्रेसचे नेते हारुन युसूफ आणि अरविंदरसिंग लवली यांनी सांगितले, सरकार स्‍थापन केल्‍यानंतर 6 महिने अविश्‍वास प्रस्‍ताव येऊ शकत नाही. धोरणात्‍मक निर्णय मुख्‍यमंत्र्यांनाच घ्‍यावे लागतात. त्‍यात सहकारी पक्षांची भूमिका नसते. पाणी आणि वीज स्‍वस्‍तात देण्‍याच्‍या मुद्यावर पाठींबा न देण्‍याचा मुद्दाच उपस्थित होत नाही.

भाजपने या संपूर्ण प्रकारावरुन 'आप'ला ढोंगी म्हटले आहे. त्‍यातच एकूण परिस्थितीचा अंदाज घेऊन नायब राज्‍यपाल नबीज जंग यांनी गृहमंत्रालयाला दिल्‍लीत राष्‍ट्रपती शासन लागू करण्‍याची सूचना केल्‍याची माहिती आहे. आधी 'आप'च्‍या अटी थेट फेटाळणा-या कॉंग्रेसने नंतर सावध पावित्रा घेतला असून केजरीवालांच्‍या अटींवर चर्चा करुन 1-2 दिवसांमध्‍ये उत्तर देऊ असे कॉंग्रेसने म्‍हटले आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद यांनी सांगितले, की केजरीवालांनी दिलेले पत्र सोनिया गांधींनी माझ्याकडे पाठविले आहे. त्‍यावर सविस्‍तर चर्चा करुन उत्तर देण्‍यात येईल.

'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी नजीब जंग यांची राजभवनात भेट घेतली. भारतीय जनता पक्षाने सरकार स्‍थापन करण्‍यास नकार दिल्‍यानंतर नायब राज्‍यपालांनी 'आप'ला सत्ता स्‍थापनेसाठी चर्चा करण्‍यासाठी आमंत्रित केले होते. केजरीवाल यांनी 'आप'च्‍या निर्णयाचे पत्र नायब राज्‍यपालांना सोपविले. केजरीवाल सरकार स्‍थापनेबाबत चर्चा करण्‍यासाठी 10 दिवसांची मुदत मागितली. परंतु, केजरीवाल यांनी पाठींबा घेण्‍यासाठी कॉंग्रेस आणि भाजपसमोर 17 अटी ठेवल्‍यानंतर दिल्‍लीचा गुंता सुटण्‍याऐवजी आणखी वाढला आहे.

दोन्‍ही पक्षांनी केजरीवालांच्‍या अटी फेटाळल्‍या असून केजरीवालांवर टीका केली आहे. त्‍यामुळे एकूण परिस्थिती पाहता दिल्‍लीत सोमवारपासून राष्‍ट्रपती शासन लागू होण्‍याची दाट शक्‍यता आहे. सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, नजीब जंग यांनी गृहमंत्रालयाला पत्र पाठवून राष्‍ट्रपती शासन लागू करण्‍याची सूचना केली आहे. त्‍यासोबतच विधानसभा भंग करण्‍यात येऊ नये, असेही म्‍हटले आहे.

केजरीवाल यांनी ठेवलेल्‍या अटी वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...