आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aap Bjp Arvind Kejriwal In Gujarat General Elections 2014 Latest News In Marathi

गुजरातमध्ये केजरीवालांविरोधात तर, पाटण्यात आप नेत्या परवीनविरोधात एफआयआर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात गुजरातमध्ये तर त्यांच्या पक्षाच्या बिहारमधील नेत्या परवीन अमानुल्ला यांच्या विरोधात आदर्श निवडणूक आचारसंहिता भंग प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहितेचे त्यांनी उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी त्यांना समन्स बजावण्याची शक्यता आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय नेत्यांच्या सभेसाठी लाउडस्पिकरचा वापर करण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक असते. गुरुवारी कच्छमध्ये केजरीवाल यांनी या नियमांचा भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
केजरीवालांच्या पोलिसांच्या हातावर तुरी
आप नेते अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी रात्री अहमदाबाद पोलिसांना चकमा दिला. केजरीवाल यांचा ताफा कच्छहून अहमादबादला येत असताना अहमदाबाद जिल्ह्यातील विरमगावचे पोलिस त्यांच्या ताफ्यासोबत होते. सरखेज चौकातून त्यांचा ताफा रिंगरोडच्या दिशेने वळाला, पोलिसही त्यांच्या मागेच होते. काही वेळाने ताफा थांबला. पोलिसांनी आपचे नेते आणि माजी आमदार डॉ. कनूभाई कलसरिया यांची कार थांबवून त्यांच्याकडे केजरीवाल यांच्यासंबंधी विचारणा केली मात्र, त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. पोलिसांचा समज झाला, की डॉ. कलसरिया यांच्यासोबतच केजरीवाल आहे. मात्र त्यांनी पोलिसांना चकमा देत दुस-या कारमधून पलायन केले. डॉ. कलसरिया यांच्या चालकाकडे पोलिसांनी विचारणा केली असता त्यानेही माहित नसल्याचे उत्तर दिले.
दिल्लीत संकट वाढणार
गुजरात दौ-याच्या पहिल्याच दिवशी (बुधवार) केजरीवाल अडकले होते. अनेक गाड्यांचा ताफा घेऊन ते गुजरातच्या रस्त्यांवर 'रोड शो'साठी निघाले होते. मात्र, आचारसंहिता लागू झाली असल्यामुळे त्यांनी रोड शोची परवानगी घेतली का याची विचारपूस करण्यासाठी त्यांचा ताफा रोखण्यात आला होता. त्यानंतर दिल्ली आणि लखनऊमध्ये आपच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर निदर्शने केली. दिल्लीत या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या हिंसे प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आपच्या 33 कार्यकर्ते आणि नेत्यांविरोधात गुन्हे दाखल केले. 14 जणांना पोलिसांनी अटक केली होती. गुरुवारी सायंकाळी दिल्लीतील निदर्शनाचे नेतृत्व करणारे आपचे प्रवक्ते आशुतोष आणि शाजिया इल्मी यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आपच्या या हिंसक निदर्शनाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर आयोगाने आपला पक्षाची मान्यता रद्द का करु नये, अशी नोटीस बजावली आहे. या नोटीशीला आज आप उत्तर देण्याची आपेक्षा आहे.
पाटण्यात आपच्या नेत्या परवीन अमानुल्ला यांनी विना परवानगी पुनपुन वीज कार्यालयासमोर आंदोलन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्यासह पाच कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील स्लाइडमध्ये, मोदी विरोधकांनाच संपवत आहेत