आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aap Bjp Clash Arvind Kejriwal Aam Admi Party Delhi Police Ashutosh Latest News

पोलिसांनी केली आशुतोष-शाजियाची चौकशी, गुजरातमध्ये केजरीवालांविरोधात निदर्शने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली - बुधवारी 'आप' आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. पोलिसांनी गुरुवारी 'आप' चे नेता आशुतोष आणि शाजिया इल्मी यांची चौकशी केली. या दरम्यान पोलिसांनी या दोन्ही नेत्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. आशुतोष यांना मॉडेल टाऊन येथील पक्षाच्या कार्यालयातून पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले, तर शाजिया इल्मी यांना निवासस्थानाहून पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशीनंतर पोलिस स्टेशनबाहेर पडलेल्या आशुतोष यांनी मिडियाला सांगितले की, मी शांततेने निदर्शन करत होतो कोणालाही हिंसा करण्यास प्रवृत्त केले नाही. दिल्ली पोलिसांनी भाजप नेत्यांची चौकशी न केल्याबद्दल आशुतोष यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणूक आयोगाच्या नोटीस प्रकरणी त्यांनी सांगितले की, मी आयोगाच्या नोटीसला उत्तर देणार आहे.

आशुतोष यांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे आशुतोष यांच्या पक्षाच्या नेत्या शाजिया इल्मी यांनी आशुतोष यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. शाजियांनी सांगितले, की आशुतोष यांनी बुधवारी इमारतीच्या भिंतीवर चढण्याची काहीच गरज नव्हती. त्या म्हणाल्या 'आम्ही शांततेने आंदोलन करत होतो, तेवढ्यात त्यांनी (भाजप कार्यकर्त्यांनी) आमच्यावर दगडफेक केली. आम्ही हिंसेचे उत्तर हिंसेने दिले, याचा आम्हाला खेद आहे. यासाठी कोणतीही पळवाट असू शकत नाही. मला असे वाटते, की आशुतोष भाजप कार्यकर्त्यांच्या हिंसेमुळे भडकले असावेत, तरीही त्यांना इमारतीच्या भिंतीवर चढण्याची आवश्यकता नव्हती.'
भाजप मुख्यालयाबाहेर धिंगाणा घालणा-या 14 कार्यकर्त्यांना आज (गुरुवार) पटियाला हाऊस कोर्टासमोर हजर करण्यात आले असून त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.
भाजपने हे प्रकरण निवडणूक आयोगापर्यंत नेले आहे. त्यानंतर आयोगाने आम आदमी पार्टीला नोटीस बजावली आहे. भाजप नेते 'आप'ची तक्रार करण्यासाठी निवडणुक आयोगाकडे गेले होते. भाजप नेते हर्षवर्धन, मुख्तार अब्बास नक्वी आणि नलिन कोहली निवडणूक आयोगाकडे गेले होते. .
पुढील स्लाइडमध्ये, केजरीवालांनी केला गुजरात सरकारला सवाल...