आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आप-भाजप यांची परस्परविरोधी निदर्शने, केजरीवाल सरकारचा निगराणीचा डाव-भाजप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अरविंद केजरीवाल यांचे सरकार जनतेवर निगराणी ठेवण्यासाठी महागडी उपकरणे खरेदी करणार असल्याचे उघड झाले असून भाजपने शनिवारी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. सतीश उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.
केजरीवाल सरकारने नागरिकांच्या खासगी जीवनात हस्तक्षेप करणारी कृती करण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच निगराणी ठेवणाऱ्या उपकरणांच्या खरेदीला मंजुरी दिल्याचे मीडियातून जाहीर झाले आहे. सरकारच्या दहशतवाद प्रतिबंधक शाखेला ही यंत्रणा दिली जाणार आहे. त्या माध्यमातून नागरिकांचे फोन, इंटरनेट सर्फिंग इत्यादींविषयी माहिती गोळा केली जाणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी भाजपने आंदोलन केले, परंतु दिल्ली सरकारने हा आरोप फेटाळून लावला आहे. जनतेच्या खासगी आयुष्याला चव्हाट्यावर आणण्याची दिल्ली सरकारची इच्छा आहे, परंतु त्यांना हा हक्क कोणी दिला. अशा प्रकारची यंत्र खरेदीची परवानगी आपण दिली का? आम्ही स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतो. हे कदापिही खपवून घेणार नाही, असे प्रदेश भाजपाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना हटवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर पाणी सोडले. त्यानंतरही अनेक कार्यकर्ते बॅरिकेड्सवर चढण्याचा प्रयत्न करत होते. बराचवेळ पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट उडाल्याचे पाहायला मिळाले.
‘कॅबिनेट नोट’ फुटली कशी?
आप सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा तपशील बाहेर आलाच कसा, याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले पाहिजे, असे काँग्रेसने म्हटले आहे. सरकार अतिशय महागड्या आणि उच्च तंत्रज्ञानाची खरेदी करणार आहे. ही बाब मीडियापर्यंत कशी पोहोचली? त्यानंतर राजकीय प्रतिस्पर्ध्याला आयतीच संधी मिळाल्याचे अजय माकन म्हणाले.
जंतरमंतरवर आंदोलन
आपच्या युवा विभागाकडून शनिवारी जंतरमंतरवर आंदोलन करण्यात आले. आयआयटी मद्रासच्या विद्यार्थी संघटनेवर घालण्यात आलेल्या बंदीच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आपले मत मांडण्याचा दलित समुदायाला अधिकार नाही का, असा सवाल आप नेते आशुतोष यांनी केला आहे.
बातम्या आणखी आहेत...