आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

AAP आमदार म्हणाले, केंद्राची अधिसूचना घटनाबाह्य, विशेष अधिवेशनात होणार चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली सरकारला मर्यादित अधिकार असल्याचे सांगणाऱ्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेविरोधात 'आप'च्या आमदारांचा राग उफाळून आला. रविवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर आप नेते सौरभ भारद्वाज यांनी केंद्र सरकारची अधिसूचना असंविधानिक असल्याचे म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत भारद्वाज म्हणाले, की लोकशाहीच्या मुलभूत सिद्धांताच्याविरोधात ही अधिसूचना आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले, की 26 मे पासून सुरु होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनात केंद्र सरकारच्या अधिसूचनेवर चर्चेसाठी प्रस्ताव ठेवला जाईल.
अधिसूचनेविरोधात प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता
विधानसभेच्या विशेष अधिवेशनात नायब राज्यपालांना प्रशासन प्रमुख ठरविणाऱ्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेविरोधात ठराव मंजूर होण्याची शक्यता आहे. यामुद्यावरुन केजरीवाल सरकार केंद्राच्या भूमिकेवर नाराज आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अधिसूचनेची तुलना स्वातंत्र्यपूर्व काळातील इंग्लंडची महाराणी आणि व्हाइसराॅय यांच्याशी केली होती. नायब राज्यपाल व्हाइसराॅय आणि पंतप्रधान कार्यालय ब्रिटनची महाराणी आहे, असा आरोप त्यांनी केला होता.