आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aap Challenges Narendra Modi To Contest Against Rahul Gandhi In Loksabha

मोदींनी राहुल गांधींविरुद्ध निवडणूक लढवावी- \'आप\'चे आव्‍हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍लीच्‍या मुख्‍यमंत्रीपदाची सुत्रे स्‍वीकारल्‍यानंतर सीएम अरविंद केजरीवाल यांनी पहिल्‍याच दिवशी धडाकेबाज निर्णयांचा सपाटा लावला. त्‍यांनी स्‍वतः 6 तास काम केले. पहिल्‍या दिवशी त्‍यांनी 9 अधिका-यांची बदली केली. आम आदमी पार्टीकडून आणखी धाडसी निर्णय घेण्‍यात येणार आहेत. वीज आणि पाण्‍याबाबत सोमवारी निर्णय होण्‍याची शक्‍यता आहे. धाडसी निर्णय घेणा-या आम आदमी पार्टीने भारतीय जनता पक्षाच्‍या दिग्‍गजांना आव्‍हान दिले आहे. घरणेशाहीवर टीका करणा-या भाजपच्‍या नेत्‍यांनी अमेठीतून राहुल गांधी यांच्‍याविरुद्ध निवडणूक लढवून दाखवावी, असे खुले आव्‍हान 'आप'चे नेते कुमार विश्‍वास नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. ते स्‍वतः राहुल गांधींविरुद्ध निवडणूक लढविणार आहेत.

कुमार विश्‍वास म्‍हणाले, दिल्‍लीतील सरकार किती दिवस टिकेल याची चिंता पक्षाला नाही. भाजपचे निर्णय नागपुरात (संघ मुख्‍यालय) आणि कॉंग्रेसचे निर्णय 10 जनपथ (सोनिया गांधींचे निवासस्‍थान) येथे होतात, असा टोलाही विश्‍वास यांनी लगावला.

मोदींबाबत काय म्‍हणाले कुमार विश्‍वास... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये..