आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आप’ने प्रतिस्पर्धी उमेदवारही ठरवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आम आदमी पार्टीने रविवारी लोकसभेसाठी आपले 20 उमेदवार जाहीर केले. त्यात कोणकोणत्या विद्यमान खासदारांच्या विरोधात हा पक्ष उमेदवार उभे करणार आहे हे स्पष्ट करण्यात आले. आपल्याबरोबर इतर पक्षांच्या उमेदवारांची यादी करणे म्हणजे हास्यास्पद आहे, अशी खिल्ली काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी उडवली आहे.
आपविषयी बोलायचे तर त्यांनी स्वत:चे हसे करू घेतले आहे. कारण आपल्या उमेदवारासोबत त्यांनी इतर पक्षांच्या उमेदवारांची नावेही यादीत जाहीर केली. प्रतिस्पर्धी पक्षाच्या उमेदवाराची नावे जाहीर करण्यात आली. खरे तर त्यांनी स्वत:पुरते उमेदवार जाहीर केले असते तर बरे झाले असते, असा टोला तिवारी यांनी लगावला. माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री म्हणाले, आपले उमेदवार जाहीर करताना प्रत्येक पक्ष एक प्रक्रिया पूर्ण करतो. लोकशाहीमध्ये रिंगणात कोणीही उतरू शकतो. सर्वांचे स्वागतच आहे. लुधियाना मतदारसंघाचे प्रतिनिधित्व तिवारी करतात. त्यांच्याविरोधात आपने वकील एच. एस. फुलका यांच्या नावाची घोषणा केली आहे. दरम्यान, तिवारी यांनी पी. चिदंबरम यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाची पाठराखण केली. अर्थमंत्र्यांनी एका श्रेणीसाठी एक निवृत्तिवेतन अशी घोषणा केली आहे. त्याचा फायदा निवृत्त कर्मचाºयांनाही होणार आहे, असे तिवारी म्हणाले.
केजरीवालांनी उत्तर द्यावे
आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी अलीकडेच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. केजरीवाल यांनी राजीनामा का दिला, त्यांनी दिलेली आश्वासने का पाळली नाहीत, याची उत्तरे त्यांनी दिली पाहिजेत. दिल्ली निवडणुकीच्या काळात या लोकांनी जनतेला आश्वासने दिली होती. मग आता त्यांनी सत्ता सोडून पळ का काढला, असा सवाल तिवारी यांनी उपस्थित केला.
स्थैर्याला प्राधान्य
केंद्रातील यूपीए सरकारने नेहमीच लोकप्रिय घोषणा करण्याचे प्रकर्षाने टाळले आहे. दहा वर्षांच्या काळात काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारने जागतिक मंदीच्या लाटेतही भारतीय अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्यासाठीच योजना राबवल्या आहेत. त्यानुसार कामे केली आहेत, असे तिवारी म्हणाले.
केजरीवालांवर जास्त चर्चा न करणेच लोकशाहीसाठी हितावह : मोईली
नवी दिल्ली- लो‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांच्याबाबत चर्चा न करणेच लोकशाहीच्या दृष्टीने हिताचे ठरणार आहे, तसे झाले तर खूप चांगले होईल, असा सल्ला पेट्रोलियममंत्री एम. वीरप्पा मोईलींनी दिला आहे.अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासाठी मोठे आंदोलन केले होते. त्या वेळी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त समितीवर केजरीवाल यांना घेण्याची चूक झाली, अशी कबुली मोईली यांनी दिली. समितीचे अध्यक्षपद अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याकडे आहे. ही समिती लोकपाल विधेयकाचा मसुदा ठरवण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कमी चर्चा करणे हेच लोकशाहीच्या हिताचे होईल. आपली ऊर्जा त्यांच्यावर चर्चा करून व्यर्थ घालवू नका. केजरीवाल यांच्यासारख्या व्यक्तीवर चर्चा करून भारताची ऊर्जा घालवण्याला अर्थ नाही हे माझे स्पष्ट मत आहे.