आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नजीब जंग यांच्यावर अटकेची कारवाई करा : आप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजधानीतील महानगरपालिकेतील अधिकारी एम.एम. खान यांच्या हत्येच्या प्रकरणात नायब राज्यपाल नजीब जंग यांची भूमिका संशयास्पद असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने गुरुवारी केली.

पक्षाचे दिल्लीचे समन्वयक दिलीप पांडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन जंग यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला. खान यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र जंग यांनी महानगरपालिकेला लिहिले होते. मग अशी सूचना का करण्यात आली ? जंग यांना अटक करण्यात यावी, त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, दिल्ली पोलिसांनी जंग यांना रिपोर्टिंग करण्याचे थांबवले पाहिजे, त्यांनी गृह खात्याला रिपोर्ट करावेत, अशी आक्रमक भूमिका आपने घेतली आहे. एमएम खान हे महानगरपालिकेत इस्टेट अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांनी दिल्लीतील प्रसिद्ध हॉटेल उद्योजक रमेश कक्कर यांच्याकडून लाच घेण्यास नकार दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी खान यांची हत्या झाली होती. द कॅनॉट नावाच्या हॉटेलला लीजवर जागा देण्यासाठी अंतिम आदेशाला मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न कक्कर यांनी केला होता. पालिकेच्या जागेवर हॉटेल चालवली जात होती. वास्तविक या प्रकरणात भाजपचे एक खासदार व नायब राज्यपाल यांना तत्काळ अटक करण्याची गरज आहे, असे आपने म्हटले आहे.

भाजपचे खासदार गिरी यांचे नाव
हत्येच्या प्रकरणात भाजपचे खासदार महेश गिरी यांचे नावही चर्चेत आले आहे. जंग यांनी ११ मे रोजी पालिकेला एक पत्र पाठवले होते. त्यात गिरी यांच्या पत्राचा उल्लेख करण्यात आला होता. कक्कर यांच्या बाजूने निर्णय घ्यावा, असे राज्यपालांनी पालिकेला कळवले होते. मात्र, गिरी यांनी आपल्यावरील आरोपांचे खंडन केले आहे. या प्रकरणात जंग यांनाही कोर्टात हजर करणे अपेक्षित होते, परंतु तसे झालेले नाही. १७ मे रोजी जंग यांनी पालिकेला पत्र पाठवले होते.
बातम्या आणखी आहेत...