आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"आप'चा आत्महत्येचा ड्रामा शोकांतिकेत बदलला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शेतकऱ्याच्या आत्महत्येवरून आम आदमी पार्टीवर जोरदार टीका केली आहे. संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरने म्हटले आहे की, "आप'च्या रॅलीत राजस्थानातील शेतकरी गजेंद्र सिंह याने आत्महत्या केली. "आप'ने शेतकरी आत्महत्येचे नाटक तयार केले होते. परंतु दुर्दैवाने ते शोकांतिकेत बदलले. "आप' डर्टी पॉलिटिक्स करत आहे. त्यांनी या घटनेपासून बोध घ्यावा, असा सल्लाही संघाने िदला आहे.

"आप'च्या शेतकरी रॅलीत २२ एप्रिल रोजी गजेंद्र सिंह या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. याप्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनाझरमध्ये इतरांपेक्षा वेगळे असल्याच्या "आप'च्या दाव्याला आव्हान देताना म्हटले आहे की, त्यांनी राजकारणात मनोरंजनाचा राजकीय रंग भरला आहे. ते शेतकरी आत्महत्येचा ड्रामा करू पाहत होते. मीडियाच्या माध्यमातून जनतेचे लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नात काही तथाकथित शेतकऱ्यांना त्यांनी आत्महत्या करायला प्रोत्साहित केले. या घाणेरड्या राजकारणात एका व्यक्तीला खरोखरच जीव गमवावा लागला. "आप' निवडणुकीत दरवेळी अशाच प्रकारचे डावपेच रचते. असा आराेप या लेखामध्ये करण्यात आला आहे.

नियतकालिकातील या लेखात इंदिरा गांधींच्या "गरिबी हटाओ' नरेंद्र मोदींच्या "अच्छे दिन' सारख्या घोषणांचा उल्लेख करताना म्हटले आहे की, असे आकर्षक शब्द मतदारांच्या मनाला भुरळ घालतात. परंतु "आप'ने शेतकरी रॅलीच्या नावावर जे काही केले त्यातून त्यांनी राजकारणाची खालची पातळी गाठली आहे.

गजेंद्र सिंहला हुताम्याचा दर्जा त्याच्या नावे योजनाही
दिल्लीत अवकाळी पावसामुळे पिके नष्ट झाल्यास शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाई योजनेला केजरीवाल सरकारने गजेंद्र सिंहचे नाव दिले आहे.
तसेच गजेंद्रला हुतात्म्याचा दर्जा देण्याची घोषणाही सरकाराने केली आहे. या शिवाय गजेंद्रच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकार नोकरी देणार आहे. गजेंद्रच्या भावाला बोलावून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या जात असल्याची कल्पना दिली. पक्षाचे नेता संजय सिंह अन्य तीन आमदारांनी दोन दिवसांपूर्वी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांनी केजरीवाल आपच्या नेत्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.