आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AAP Exposes \'conspiracy To Save Kanimozhi\' In 2G

2जी घोटाळ्यात कनिमोझीला वाचवण्यासाठी आखला होता \'प्लान\'; प्रशांत भूषण यांचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आम आदमी पक्षाचे (आप) नेता प्रशांत भूषण यांनी 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी एक खळबळजनक दावा केला आहे. द्रविड मुन्नेत्र कजगम (द्रमुक) अर्थात डीएमके प्रमुख करूणाधिधी यांनी आपली कन्या व पक्षाच्या खासदार कनिमोजी यांना वाचवण्यासाठी एक प्लान आखला होता. भूषण यांनी 2जी घोटाळ्याशी संबंधित फोन रेकॉडिंग आज (मंगळवारी) पत्रकार परिषदेत सादर केले.

रेकॉडिंगमध्ये 'स्टेट इंटेलिजन्स'मध्ये कार्यरत असलेले अधिकारी जाफर आणि कलीनगर टीव्हीचे सीईओ शरद कुमार यांच्यात झालेले संभाषण असल्याचा दावा भूषण यांनी केला आहे. कलीनगर टीव्ही ग्रुप करुणानिधी यांच्या मालकीचा आहे.

भूषण म्हणाले, दुरध्वनिवरील संभाषणात टाटाद्वारा व्होल्टाजची 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची जमीन बक्षिसी म्हणून देण्याबाबतही उल्लेख झाला होता. उल्लेखनिय म्हणजे यापूर्वी कॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडिया आणि रजती अंबल यांच्या चर्चेत आला होता.

2जी घोटाळ्याचा खुलासा करताना भूषण म्हणाले, 10 जानेवारी 2008 ला टेलीकॉमचे परवाने वितरीत करण्‍यात आले होते. या काळात रतन टाटा यांनी कनिमोझी यांच्या एनजीओला दोन लाख रुपयांची देणगी दिली होती. एवढेच नाही तर 13 नोव्हेंबर 2008 रोजी रतन टाटा यांनी कनिमोझी यांना पत्र लिहिले होते. विशेष म्हणजे नीरा राडियांच्या हस्ते हे पत्र करुणानिधी यांना पाठवण्यात आले होते. या पत्रातून टाटांनी दूरसंचार मंत्री ए.राजा यांची खूप प्रशंसाही केली होती.

सर्व संभाषण 'नोकिया' फोनवरून रेकॉडिंग करण्यात आले आहे. ही सर्व माहिती जाफर यांच्या मोबाइलवरून रेकॉडिंग करण्यात आल्याची शक्यता आहे. मात्र, हे रेकॉडिंग उघडकीस कसे आले याबाबत समजू शकले नाही. सीबीआय आणि लोकपाल आयुक्त या रेकॉडिंगची चौकशी करू शकतात, असे आवाहन देखील भूषण यांनी केले आहे.

पुढे वाचा , 'आप'चा पॉलिटिकल तमाशा;आम आदमी पार्टीचे धोरण- खोटे बोलण्याचे राजकारण!