आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आप सरकारच्या पत्रपरिषदेत गोंधळ, सचिवालयातील प्रवेशबंदीला पत्रकारांचा विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीत आम आदमी पार्टी (आप) सरकारच्या पहिल्या पत्रकार परिषदेत सोमवारी गोंधळ झाला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया सरकारच्या निर्णयाची माहिती देण्यासाठी आले होते. मात्र, गोंधळ वाढत गेल्यानंतर ते काही न बोलता निघून गेले.
दिल्ली सरकारने सचिवालयात पत्रकारांवर प्रवेशबंदी लागली आहे. त्यांना केवळ मीडिया कक्षापर्यंत मर्यादित ठेवण्यात आले आहे. या मुद्द्यावर त्यांनी शिसोदिया यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. मात्र, शिसोदिया यांनी पत्रकार परिषद रद्द करून निर्णयाची माहिती दिल्ली सरकारच्या वेबसाइटऐवजी पक्षाच्या साइटवर देण्यात आली. त्याआधी केजरीवाल यांनी ताप उतरताच सोमवारी कामकाजाला सुरुवात केली. यामध्ये अतिक्रमण न हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. शाहदरामध्ये शनिवारी ८ झोपडपट्ट्या हटवण्याच्या निर्णयाविरोधात नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर निदर्शने केली होती.

मुख्यमंत्र्यांच्या आवश्यकतेनुसार सुरक्षा व्यवस्था बदलणार : बस्सी
दिल्ली पोलिस मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अन्य कॅबिनेट मंत्र्यांच्या सुरक्षेचा आढावा घेणार आहे. दिल्ली पोलिस आयुक्त बी.एस.बस्सी म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिमंडळाची सुरक्षा आमची जबाबदारी आहे.केजरीवाल यांना मुख्यमंंत्री म्हणून झेड दर्जाची सुरक्षा देणार आहेत. मात्र, त्यांचा यास नकार आहे.

पोलिसांनी सहकार्य करावे : राजनाथ
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्ली पोलिसांना आप सरकारला संपूर्ण सहकार्य करण्यास सांगितले आहे. सिंह म्हणाले, दिल्ली नवे सरकार आले आहे, याची मी आठवण करून देऊ इच्छितो. विकास प्रक्रिया पुढे नेण्यासाठी तुम्ही आप सरकारला मदत कराल, याची
आशा आहे.

एक आश्वासन पूर्ण
झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा. सर्व विभागांना पत्र पाठवून अतिक्रमण हटवण्यावर बंदी वित्त आणि ऊर्जा विभागाला वीज बिल निम्मे करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश डी. जी. होमगार्डना डीटीसी बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मार्शल म्हणून नियुक्तीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश