आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम केजरीवालचा 28 डिसेंबरला शपथविधी, पहिलेच आश्वासन पूर्ण करण्यात असमर्थ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- टीम केजरीवालचा 28 डिसेंबर (शनिवार) रोजी रामलिला मैदानावर शपथविधी होणार आहे. यापूर्वी शपथविधीसंदर्भात तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत होते. अरविंद केजरीवाल यांनीही शपथविधी कधी होणार, हे सांगण्यास असमर्थता दर्शविली होती. उद्या टीम केजरीवालचा शपथविधी होणार असल्याची माहिती यापूर्वी मिळाली होती. परंतु, आता निश्चित तारीख आल्याने येत्या शनिवारी केजरीवाल यांचे शिलेदार आणि ते स्वतः राज्यपालांकडून शपथ घेतील.
आम आदमी पक्षाचे सरकार येण्याची तारीख जवळ येत असताना या पक्षात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे, की दिल्लीत लगेच जनलोकपाल कायदा करण्यात अडचणी येऊ शकतात. या कायद्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे सरकार आल्यावर 15 दिवसांत जनलोकपाल कायदा करण्याचे केजरीवाल यांनी निवडणूक जाहिरनाम्यान आश्वासन दिले होते.
अरविंद केजरीवाल यांनी आज (बुधवार) जनता दरबार बोलविला होता. यात त्यांनी दिल्लीकरांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले, की दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नाही. त्यामुळे कोणताही कायदा करताना केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींची परवानगी घेणे आवश्यक आहे. अशा वेळी जनलोकपाल विधेयक लगेच मंजूर करण्यात अडथळे येऊ शकतात. परंतु, आमचे सरकार आल्यावर जनतेला फ्रीमध्ये पाणी उपलब्ध करून दिले जाईल.
दरम्यान, कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनावर बोलताना केजरीवाल म्हणाले, की ही कॉंग्रेसची अंतर्गत बाब आहे. यात आम्ही लक्ष घालण्याची गरज नाही.
आम आदमी पक्षाचे आमदार विनोद कुमार बिन्नी यांच्या कथित नाराजीवर बोलताना केजरीवाल म्हणाले, की यासंदर्भात मीडियाने दिलेले वृत्त तथ्यहिन आहे. असे काहीही झालेले नाही. उद्या शपथग्रहण समारंभ होईल, की नाही याबाबत काहीही सांगता येणार नाही. एकदा या कार्यक्रमाची तिथी निश्चित झाल्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी निमंत्रण पाठविले जाईल.
रामलिला मैदानावर जोरदार सुरू आहे तयारी, वाचा पुढील स्लाईडवर..