आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AAP सरकारचे 49 दिवस, ज्या मुदयावर राजीनामा दिला तो लोकपालच केजरी विसरले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या (आप) सरकरला शुक्रवारी 49 दिवस पूर्ण झाले. फेब्रुवारी 2014 मध्ये आपचे पहिले सरकार दिल्लीत सत्तेवर आले होते, तेव्हा 49 व्या दिवशी त्यांनी राजीनामा दिल होता. लोकपालच्या (जनलोकपाल) मुद्यावर तेव्हा केजरीवाल यांनी सत्तेचा त्याग केला होता. मात्र, आता दुसर्‍यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी अरुढ झालेल्या केजरीवालांना लोकपालचा विसर पडल्याचे दिसत आहे. सत्तेत येऊन 49 दिवस झाल्यानंतरही त्यांनी लोकपालचा साधा उल्लेख केलेला नाही. एवढेच नाही तर पारदर्शक कारभार आणि भ्रष्टाराचाराचा मुद्दा घेऊन राजकारणात आलेल्या केजरीवालांनी त्यांचेच पक्षांतर्गत लोकपाल अॅडमिरल रामदास यांना वादग्रस्तपणे पदावरुन दूर केले आहे. आपचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी लोकपाल मुद्यावर केजरीवाल सरकारवर निशाणा साधला आहे.
गर्ग यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकपाल विषयावर लिहिले आहे, 'आज केजरीवाल सरकारचा 49 वा दिवस आहे. गेल्या वेळी 49 व्या दिवशी अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेत बहुमत नसल्यामुळे जनलोकपाल कायदा मंजूर करता येत नसल्याबद्दल खेद व्यक्त करत त्यासाठी एकदा नाही तर, हजारदा राजीनामा देईल... जनलोकपाल लागू करणे माझ्या आयुष्यातील प्राथमिकता आहे. त्यासाठी कितीही वेळेस राजीनामा देण्याची तयारी आहे... आता दिल्लीत आपचीच सत्ता आहे, पूर्ण बहुमत आहे. मात्र, केजरीवाल जनलोकपाल कायद्यावर मौन बाळगून आहेत. असे का? आहे का काही उत्तर...'
फक्त लोकपालच नाही तर, केजलीवाल यांचे पहिले 49 दिवसांचे सरकार आणि आताच्या सरकारमध्ये मोठे अंतर दिसत आहे.
भ्रष्टाचार
49 दिवसांचे सरकार

केजरीवालांच्या 49 दिवसांचे सरकारमध्ये भ्रष्टाचार मोठा मुद्दा होता. त्यांनी 49 दिवसांचे कार्यकाळात भ्रष्टाचार विरोधी विभागाने सरकारी अधिकारी, कर्मचारी, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यासारखे नेते आणि खासगी कंपन्यांनवर खटले दाखल केले होते.
स्टिंग
49 दिवसांचे सरकार
गेल्यावेळच्या सरकारमध्ये केजरीवाल यांनी लोकांना लाच देण्याचे स्टिंग करण्याचाचे आवाहन केले होते. त्यासाठी एक कॉल सेंटर सुरु केले होते. तिथे लोक त्यांनी केलेल्या स्टिंगचा ऑडिओ - व्हिडिओ पाठवत होते. केजरीवाल सरकार हे स्टिंग माध्यमांना शेअर करत होते.
जनलोकपाल
49 दिवसांचे सरकार
गेल्या वेळच्या सरकारच्या कार्यकाळात जनलोकपाल हा आपसाठी सर्वात मोठा मुद्दा होता. या मुद्यावर आपचे सर्वच नेते गंभीर होते. त्यांनी यासाठीच 49 दिवसांत राजीनामा दिला होता.