आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AAP, Kejriwal And Party Founder Give Answer On Foreign Fund Delhi High Court

विदेशी देणग्यांबाबत ‘आप’,केजरीवाल व पक्षाच्या संस्थापकांनी उत्तर द्यावे - दिल्ली उच्च न्यायालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीने अनेक कायद्यांचे उल्लंघन करून विदेशातून देणग्या मिळवल्याचा आरोप करणार्‍या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाने बुधवारी आम आदमी पार्टी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पक्षाच्या संस्थापकांना उत्तर देण्यास सांगितले आहे. ‘आप’विरुद्ध गुन्हेगारी खटला दाखल करण्याची मागणी याचिकेत आहे. न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांच्या पीठाने सांगितले की, याचिकेची प्रत आपची बाजू मांडणार्‍या प्रशांत भूषण यांना दिली जावी. 28 फेब्रुवारीआधी चार दिवस उत्तर सादर करण्याचेही निर्देश त्यांनी ‘आप’ला दिले.
बिन्नी यांनी पाठिंबा काढला
‘आप’चे बंडखोर आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी केजरीवाल यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप करत दिल्ली सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. याबाबतीत आपण नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेऊन सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे पत्र त्यांना देऊ, असे बिन्नी म्हणाले.