नवी दिल्ली- भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांना घेरण्यासाठी आम आदमी पक्षाने (
आप) नवी रणनीती आखली आहे. 'आप'चे संयोजक अरविंद
केजरीवाल हे किरण बेदी यांच्यावर थेट टीका करणार नाहीत. किरण बेदी यांच्यावर यांना घेरण्यासाठी कुमार विश्वास यांना तयार करण्यात आले आहेत. कुमार विश्वास हे 'आप'चे नेते आहेत.
भाजपने घोषित केलेला मुख्यमंत्रिपदाचा उमदेवार किरण बेदी याच्या
केजरीवाल यांच्या तोडीच्या नाहीत. त्यामुळेच त्यांनी केजरीवाल यांच्या विरोधात लढण्यास स्पष्ट नकार दिला आहे. भाजपच्या नेते अथवा किरण बेदी या केजरीवाल यांच्यावर टीका करतील तर त्यांना कुमार विश्वास प्रत्युत्तर देतील.
'आप'च्या नव्या रणनीतीनुसार, केजरीवाल फक्त जनतेशी संबंधित मुद्यांवर वक्तव्य करणार आहेत. किरण बेदींवर थेट टीका करण्यात येणार नाही. किरण बेदी यांनी 'आप'सह केजरीवाल यांच्यावर टीका केल्यास त्यांना ठोस प्रत्युत्तर दिले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, भाजपने किरण बेदी यांना कृष्णानगर मतदार संघातून उमेदवार दिली आहे. कृष्णानगर हा भाजपचा गड आहे. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन हे सलग येथून निवडून आले आहे. किरण बेदींमध्ये केजरीवाल यांच्या विरोधात लढण्याची हिम्मत असती तर त्यांनी नवी दिल्लीतून निवडणूक लढली असती.
केजरीवाल यांनी गेल्या निवडणुकीत नवी दिल्लीतून दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव केला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, कुमार विश्वास यांनी किरण बेदीवर घणाघाती टीका...