आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AAP Leader Arvind Kejriwal Preempts Fake Sting Ops Against Party

केजरीवाल म्हणाले, किरण बेदींच्या पराभवासाठी गोयल, उपाध्याय, हर्षवर्धन रचताहेत कट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रचारसभेत भाषण करताना अरविंद केजरीवाल
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करणारे आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी एक खळबळजनक दावा केला. भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असलेल्या किरण बेदींच्या पराभवासाठी त्यांच्याच पक्षातील नेते प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. सतीष उपाध्याय, डॉ. हर्षवर्धन यांच्यासह प्रमुख नेत्यांवर त्यांनी हा आरोप केला.
शकुरपूर वस्ती येथे आयोजित एका प्रचारसभेत केजरीवाल म्हणाले की, त्यांना काही भाजप नेत्यांनीच फोनवर ही माहिती दिली आहे. केजरीवाल म्हणाले, भाजपमध्ये भीतीचे वातावरण आहे. भाजपच्या काही नेत्यांचे मला फोनही आले. ते म्हणत होते, तुम्ही घाबरू नका, आम्ही सगळे मिळून किरणजींचा पराभव करू. मी म्हणालो, मी का घाबरू? तुम्ही आहात तर मग मला चिंता करण्याची काय गरज. केजरीवाल यांच्या मते, भाजप नेते हरीश गोयल, सतीष उपाध्याय आणि डॉ. हर्षवर्धन हेच किरण बेदींच्या विरोधात कट रचत आहेत.
किरण बेदींना म्हटले मोठी बहीण
केजरीवाल म्हणाले की, किरण बेदींना राजकारणात यायचेच होते तर त्यांनी आपसारख्या एखाद्या प्रामाणिक पक्षाची निवड करायला हवी होती. पण त्यांनी भाजपसारख्या भ्रष्ट पक्षाची निवड केली. किरणजी माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत. मी त्यांचा आदर करतो, पण त्यांना भाजपचे कारस्थान समजले नाही, असेही केजरीवाल म्हणाले.

दोन मतदान ओळखपत्रांमुळे टीका
किरण बेदी यांच्याकडे दोन मतदान ओळखपत्र असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या दोन्ही कार्डवर दोन वेगवेगळे पत्ते असल्याची माहितीही समोर आली आहे. एकावर उदय पार्क तर दुसर्‍या कार्डावर तालकटोरा येथील पत्ता आहे. असे दोन ओळखपत्र कसे देण्यास आले याचा शोध निवडणूक आयोग सध्या घेत आहे. बेदींनी मात्र या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
पुढील स्लाइड्वर वाचा, केजरीवाल यांनी स्टींगची भीती...