आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्हीवरील चर्चेत आप प्रवक्त्यांना कोसळले रडू; लोक म्हणाले, मगरीचे अश्रू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत आम आदमी पार्टीच्या किसान रॅली दरम्यान आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या मुद्यावरुन टीव्ही चॅनलवरील चर्चेवेळी पूर्वाश्रमीचे पत्रकार आणि आपचे प्रवक्ते आशुतोष यांना रडू कोसळले.
आज तक चॅनेलवर गुरुवारी चर्चा सुरु होती, की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माफी मागणे पुरेसे आहे का? या चर्चेत आशुतोष यांच्यासह भाजप नेते संबित पात्रा, काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी आणि मृत शेतकरी गजेंद्र यांची मुलगी मेघा सिंह सहभागी झाली होती. चर्चेत आशुतोष म्हणाले, 'या मुद्यावर कृपया कोणीही राजकारण करु नये. गजेंद्र यांची मुलगी देखील हेच सांगत आहे. माझी आपेक्षा आहे, भाजप आणि काँग्रेसच्या लोकांनी याचे राजकारण करणे बंद करावे.' हे सांगत असतानाच त्यांना अश्रू अनावर झाले आणि ऑन कॅमेरा त्यांना रडू कोसळले.
आशुतोष यांनी मेघाला सांगितले, 'बेटा, आम्हा सगळ्यांना धक्का बसला आहे. आम्ही सगळे तुझे गुन्हेगार आहोत. रात्रभर आम्हाला झोप लागलेली नाही. हे भाजप आणि काँग्रेसवाले राजकारण करत आहेत. एवढे घाणेरडे राजकारण करण्यासाठी आम्ही आलेलो नाही.' आशुतोष यांना ऑन कॅमेरा रडू कोसळण्याची ही काही पहिली वेळ नाही. दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणावेळी स्टुडिओमध्ये अँकरिंग करताना ते रडले होते.
सोशल मीडियावर चर्चेला ऊत
आशुतोष यांना स्टुडिओमध्ये रडू कोसळल्यानंतर सोशल मीडियावर #AshuCries टॉप ट्रेंडिगमध्ये आले. अनेकांनी आशुतोष यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. तर, काही युजर्सनी आप संकटात सापडली की ड्रामा करते असे ट्विट केले आहे. एका युजरने म्हटले आहे, ज्या मुलीचे वडील गेले ती शांत होती. तर आसवे ढाळणारे आशुतोष असे नेते आहेत ज्यांनी त्या घटनेनंतर म्हटले होते, की आता यापुढे झाडावर कोणी चढले तर त्याला उतरवण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवालांना झाडावर पाठवू.
काही निवडक ट्विट्स
@rahulroushan
See Gajendra's daughter.Even in grief,she is calm & how shameless @aajtak subjects her to Ashutosh's Theatrics. Cheap shot
@xtahzy
Shameful that Ashutosh cried on TV. He should've just asked for a glass of water, said "dosti bani rahe", and walked out.
@octotus
And all the sins are washed away. Is this some sort of sick joke? ashutosh isn't some school kid.
@Sanjaypro
Dude @ashutosh83B just cut tht crap, the girl is strong enough to debate nd u doing drama? Answr her qstns instd of weeping #AAPRallyMurder
@suhelseth
Can someone show ASHUTOSH a crocodile please?
@LutyensInsider
Rajdeep had asked Ashutosh to cry live on TV. Even when daughter of Gajendra was saying his father was killed, he started crying on Aaj Tak.