नवी दिल्ली- दिल्लीतील रोहिणी भागात रविवारी एका बैठकीला आलेले आम आदमी पक्षाचे (
आप) नेते आशुतोष यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले. पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग आणि त्यांच्या समर्थकांनी आशुतोष यांना धक्काबुक्की करत घेराव घातला. अर्ध्या तासानंतर आशुतोष यांनी भिंत कुदून स्वत:ची सुटका करून घेतली. एका समर्थकाला उमेदवारी न मिळाल्याने राजेश गर्ग हे 'आप'वर नाराज असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेली माहिती अशी की, दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका बैठकीसाठी 'आप' नेते आशुतोष रोहिणी भागात पोहोचले होते. आशुतोष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असतानाच राजेश गर्ग हे आपल्या समर्थकांसोबत कार्यक्रमस्थळी पोहोचले. आशुतोष यांना मध्येच रोखत राजेश यांनी मंचा ताबा घेतला. राजेश यांना कार्यकर्त्यासमोर पक्षाच्या रणनीतीवर घणाघाती टीका केली. विद्यार्थ्यांच्या समस्येच्या मुद्दा पुढे करत गर्ग यांनी आशुतोष यांना जाऊ देणार नाही, अशी धमकी दिली. अखेर अर्धा तासानंतर आशुतोष यांनी भिंत कुदून स्वत:ची सुटका करून घेतली.
पुढील स्लाइड्सवर वाचा, अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांना केले वादग्रस्त आवाहन...