आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुमार विश्वास यांचा दावा, भाजपच्या खासदाराने दिली होती मुख्यमंत्री बनण्याची ऑफर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : एक टिव्ही कार्यक्रमादरम्यान भाजप खासदार मनोज तिवारी आणि कुमार विश्वास.

नवी दिल्ली - दिल्लीत सरकार बनवण्याच्या संदर्भात आम आदमी पक्षाकडून भाजपवर आणखी एक आरोप करण्यात आला आहे. 'आप'चे नेते कुमार विश्वास यांनी केलेल्या दाव्यानुसार भाजपने त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. कुमार म्हणाले की, भाजपच्या एका मोठ्या नेत्याने मला हेही सांगितले होते की, आपचे 12 आमदार असे आहेत ज्यांना पुन्हा निवडणुका नको आहेत. हे विश्वास यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा द्यायला तयार आहेत. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार विश्वास यांनी ही ऑफर देणारे नेते खासदार मनोज तिवारी होते.

कुमार यांचा दावा
एका इंग्रजी वृत्तपत्रातील बातमीनुसार लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तीन दिवसांनी कुमार विश्वास यांची त्यांच्या घरी दिल्लीतून प्रथमच खासदार बनलेल्या एका भाजप नेत्याची भेट झाली होती. त्या खासदाराने त्यांनी सरकारस स्थापन करण्यासाठी मदत करावी म्हणून विश्वास यांना पहाटेपर्यंत समजावले होते. मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा देण्याची तयारीही दाखवली होती, असेही विश्वास यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.

कुमार यांच्या दाव्यावर प्रश्वचिन्ह
कुमार विश्वास यांनी लावलेल्या आरोपावर भाजप प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. काँग्रेस नेते मुकेश शर्मा यांच्या मते विश्वास यांनी त्या नेत्याचे नाव जाहीर करायला हवे. आप तर स्टींग ऑपरेशन करण्यात तरबेज आहे. मग त्यांनी या भेटीचा व्हिडिओ नक्कीच तयार केला असेल. तो सर्वांसमोर आणावा असेही भाजपने म्हटले आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आर.पी.सिंह म्हणाले की, मीही असा दावा करू शकतो की अरविंद केजरीवाल माझ्या घरी आले होते आणि त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. हा केवळ चर्चेच राहण्याचा प्रकार आहे. त्यांनी खासदाराचे नाव जाहीर करावे.