आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aap Leaders Adarsh Shastri Grand Son Of Lal Bahadur Shastri Delhi Mla News In Marathi

Apple ते Aap: एक कोटीचे पॅकेज सोडून आदर्श शास्त्री बनले \'आप\'चे आमदार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीत द्वारका मतदार संघातून आदर्श शास्त्री निवडून आले आहे. आदर्श यांनी आम आदमी पक्षाच्या(आप) तिकिटावर निवडणूक लढवली. आदर्श यांचे फॅमिली बॅकग्राउंड सगळ्यांनाच थक्क करणारे आहे. तसेच आदर्श यांनी Apple ची कोट्यवधी रुपयांच्या पॅकेजची नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला आहे. आदर्श 'आप'चे आमदार बनले आहे.

आदर्श शास्त्री यांचे फॅमिली बॅकग्राउंड कदाचित काही जणांना माहीत नसेल. आदर्श हे देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे नातू आहेत. तसेच आदर्श यांचे वडील अनिल शर्मा माजी खासदार असून कॉंग्रेसचे निष्ठावंत नेते आहेत. तरी देखील आदर्श यांनी कॉंग्रेसशी 'हात' न मिळवता 'आप'चा झाडू हाती घेतला. यामागे अनेक कडू-गोड अनुभव असल्याचे आदर्श सांगतात.

'जय जवान आणि जय किसान'ची घोषणा देत तत्कालीन पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनी देशाला एक नवी दिशा दिली‍ होती. आजोबांप्रमाणे आपल्याला देखील समाजसेवा करायची असल्याचे आदर्श यांनी सांगितले आहे.
'आप'मध्ये प्रवेश करण्यापूर्वी आदर्श शास्त्री Apple आणि Vodafone सारख्या अनेक कंपन्यात काम केले आहे. Apple मध्ये आदर्श यांना एक कोटीचे वार्षिक पॅकेज होते. 'सेल्स हेड' या पदावर ते कार्यरत होते.
द्वारका मतदार संघातून आदर्श शास्त्री यांनी कॉंग्रेसचे महाबल मिश्रा आणि भाजपचे अमित चौहान यांना आव्हान दिले. आदर्श यांनी 39366 मतांच्या फरकाने अमित चौहान यांचा पराभव केला.
'आप'चा महात्त्वाकांक्षी उपक्रम दिल्लीला 'फ्री वायफाय'ने झोन बनवण्यात आदर्श शास्त्री महत्त्वपूर्ण योगदान देण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाइडवर पाहा कोटीचे पॅकेज सोडून 'आप' आमदार आदर्श शास्त्री यांचे निवडक फोटो...