आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आप\'ची दुसरी यादी: औरंगाबादेतून सुभाष लोमटे, बीडमध्ये नंदू माधव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षातर्फे दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून त्यात महाराष्ट्राच्या 10 उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रात ग्लॅमरस चेह-याच्या शोधात असलेल्या आपचा अभिनेता - दिग्दर्शक नंदू माधवच्या रुपाने शोध पूर्ण झाला आहे. नंदू माधव बीडमधून लोकसभेची निवडणूक लढविणार आहेत. येथून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे खासदार आहेत. नंदू माधव त्यांना टक्कर देणार आहेत. आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांनी 28 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.

औरंगाबादमधून कामगार नेते सुभाष लोमटे तर, जालना मतदारसंघातून अमेरिकेत शिक्षण घेत असलेले व मूळ घाटीपुरी (जि. जालना) येथील दिलीप म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

औरंगाबाद आणि जालना येथून उमेदवारांच्या नावांची घोषणा झाल्यानंतर आपचे अनेक इच्छुक बंडाच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. ‘आप’कडून जिल्ह्यातून 223 जणांनी ऑनलाइन अर्ज भरले. त्यापैकी 16 जणांची मुलाखतीसाठी निवड झाली. बाळासाहेब सराटे औरंगाबाद किंवा जालन्यातून उभे राहण्यास इच्छुक होते. पण त्यांचा पत्ता दोन्हीकडून कट झाला आहे. मनीषा चौधरी, सुरेश पवार, पी. व्ही. मानकर, विनोद गाडे, रवींद्र बोडखे उमेदवारीचे दावेदार होते. जालना जिल्ह्यातून बाळासाहेब म्हस्के, सुभाष देठे, के. व्ही. गोडसे, प्रतिमा मसवले असे 28 जण इच्छुक होते; पण दिलीप म्हस्के यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. दिलीप सध्या अमेरिकेत पीआर एजन्सीमध्ये नोकरी करून उच्च शिक्षण पूर्ण करत आहेत. म्हस्के यांना उमेदवारी मिळाल्याने इच्छुक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. दोन दिवसांत ते दुसरा मार्ग जाहीर करतील, असा अंदाज सूत्रांनी वर्तवला.
पुढील स्लाइड्मध्ये, 'आप'च्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी