आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदीविरोधात AAPचा मोर्चा, सिसोदियांना संसद मार्ग पोलिसांनी घेतले ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटबंदीविरोधात तृणमूल काँग्रेससोबतच आम आदमी पार्टीने आंदोलन तीव्र केले आहे. मंगळवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या नेतृत्वात संसदेवर निघालेला मोर्चा संसद मार्ग येथे अडवण्यात आला असून सिसोदिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल पंजाबमध्ये आहेत. त्यांनी जनतेला मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन ट्विटरवरुन केले होते. दुसरीकडे तृणमूल काँग्रेस उद्या नोटबंदीविरोधात जंतर-मंतर येथे धरणे आंदोलन करणार आहे.
नोटबंदीविरोधात AAP आणि तृणमूल
- मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदी निर्णयाविरोधात आप आणि तृणमूल काँग्रेसने आंदोलन तीव्र केले आहे. आपने मंगळवारी सिसोदिया यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला. यात आप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
- संसद मार्गापर्यंत जाणाऱ्या या मोर्चाला पोलिसांनी आधीच अडवले आणि मोर्चाचे नेतृत्व करणारे दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना संसद मार्ग पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले.
- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखिल नोटबंदीविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. सोमवारी ममतांनी आरोप केला, की पंतप्रधान मोदी नोटबंदी विरोधात आवाज उठवणाऱ्या पक्षांना धमकावत आहेत.
- ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'आम्ही कोणत्याही धमकीला घाबरत नाही. आंदोलन सुरुच राहिल. हवे तर मला तुरुंगात टाका. ही इगोची लढाई नाही. नोटबंदीचा अॅक्शन प्लॅन तयार पाहिजे होता. लोकांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.'
- ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात बुधवारी जंतर-मंतर येथे धरणे आंदोलन होणार आहे. त्या म्हणाल्या, 23 आणि 24 तारखेला मी दिल्लीत असेल. 20 नोव्हेंबरला लखनऊमध्ये राहिल. बिहार आणि पंजाबमध्येही जाणार आहे. नोटबंदीविरोधातील लढाईत आम्ही एकटे नाही, आमच्यासोबत आणखी तीन पक्ष आहेत.
- पंतप्रधानांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असेही बॅनर्जी म्हणाल्या. त्यांचे वर्तन पदाला शोभणारे असले पाहिजे. शक्य असेल तर त्यांनी या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी, असेही बॅनर्जी म्हणाल्या.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मोर्चाच्या काय आहे मागण्या...
बातम्या आणखी आहेत...