आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्‍लीत 'आप'चे सरकार? केजरीवाल सोमवारी 11 वाजता जाहीर करणार निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍लीत सत्तेचा पेच सुटण्‍याची शक्‍यता आहे. 'आम आदमी पार्टी' सरकार स्‍थापन करण्‍याची शक्‍यता वाढली आहे. पक्षाने जनमताचा कौल घेण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यात बहुतांश नागरिकांनी सरकार स्‍थापन करण्‍यास पाठींबा दिला आहे. रविवारी दिवसभर 'आप'चे कार्यकर्ते जनतेचा कौल घेण्‍यासाठी विविध भागात फिरत होते. सोमवारी 11 वाजता अरविंद केजरीवाल सरकार स्‍थापन करण्‍याबाबत अंतिम निर्णय जाहीर करणार आहेत. त्‍यानंतर ते 12.30 वाजता नायब राज्‍यपाल नजीब जंग यांची भेट घेतील.

केजरीवाल यांनी रविवारी 4 ठिकाणी सभा घेऊन दिल्‍लीतील जनतेचे मत जाणून घेतले. गोल मार्केट भागात उपस्थित बहुतांश लोकांनी हात उंचावून सरकार बनविण्‍याच्‍या बाजूने कौल दिला. तर 44 जणांनी विरोध केला होता. याचप्रकारे सरोजिनीनगर आणि इतर सभेत मत जाणून घेतले.

'आप'ला सरकार स्‍थापन करण्‍याबाबत बहुतांश नागरिकांनी कौल दिल्‍याची सुत्रांची माहिती आहे. सरकार स्‍थापनेबाबत जनतेचे मत जाणून घेण्‍याच्‍या या निर्णयावरुन 'आप'वर टभ्‍काही होत आहे. कॉंग्रेचे नेते किरण वालिया यांनी हा प्रकार म्‍हणजे निवडणूक प्रक्रीयेचाच अपमान असल्‍याचे म्‍हटले आहे. तर अरविंद केजरीवाल यांचे टीम अण्‍णामध्‍ये सहकारी असलेले न्‍या. संतोष हेगडे यांनी या निर्णयाला अव्‍यावहारिक म्‍हटले.