आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AAP Means Item Girl In Politics, Said Noted Author Chetan Bhagat

‘आप’ म्हणजे राजकारणाच्या मंचावरील ‘आयटम गर्ल’,प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांचे वक्तव्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बॉलीवूडमधील काही अभिनेत्री स्वत:ला सिद्ध करू शकत नाहीत, त्यामुळे लवकर प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्या ‘आयटम गर्ल’ बनतात. अशीच गत सध्या आम आदमी पार्टीची झाली आहे. आप म्हणजे राजकारणातील ‘आयटम गर्ल’ आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी आम आदमी पार्टीची खिल्ली उडवली आहे.
देशाच्या राजधानीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ‘धरणे नाट्य’देखील याच प्रकारचे आहे. लोकसभा निवडणुकीत निवडून येण्याच्या हेतूने आम आदमी पार्टी अशा प्रकारे वर्तणूक करून जनतेचे लक्ष वेधून घ्यायचा विचार करत असेल तर राजकारणातील ही ‘आयटम गर्ल’ फार काळ टिकणार नाही, असे भाकीत भगत यांनी वर्तवले.
भगत यांच्याप्रमाणेच आप सर्मथकांमध्ये के जरीवाल यांच्या आंदोलनामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. मंगळवारी आपचे सदस्य व उद्योगपती कॅप्टन गोपीनाथ यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. वास्तविक भगत हे कट्टर मोदी सर्मथक समजले जातात; परंतु आप म्हणजे भारतीय राजकारणातील एक चांगला बदल असल्याचे भगत यांनी यापूर्वी म्हटले आहे. मात्र, दिल्लीतील आंदोलनावर त्यांनी जोरदार टीका केली. केजरीवाल आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने केलेला आंदोलनाचा प्रकार पाहून मला खरोखर शरम वाटते. त्यांच्या या वागण्यामुळे माझी मान खाली झुकली आहे. मंगळवारी रात्री हे आंदोलन संपले तरी अखेरीस यातून काहीच निष्पन्न झालेले दिसत नाही. आंदोलनामुळे दिल्लीचा खोळंबा, पोलिसांचे खच्चीकरण आणि उद्योग जगताच्या भावना मात्र दुखावल्या, असे भगत यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.
‘आप’च्या आंदोलनामुळे दोन पोलिसांना रजेवर पाठवले; परंतु त्यामुळे संपूर्ण दिल्ली ठप्प झाली होती. लोकसभा निवडणुकीतही यश मिळवण्यासाठी ते हातघाईवर आले आहेत. बॉलीवूडमध्ये एखादी अभिनेत्री यश मिळवण्यासाठी धडपडत असते. तिची कुणी दखल घेतली नाही की ती ‘आयटम गर्ल’बनते. तसेच आप म्हणजे भारतीय राजकारणातील ‘आयटम गर्ल’ बनली आहे. मात्र आयटम गर्लला फारसे भवितव्य नसते, अशी मल्लिनाथीही भगत यांनी केली.