आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aap Mla Akhilesh Tripathi Arrested In 2013 Rioting Casesent To Judicial Custody

आपचे आमदार अखिलेश त्रिपाठींना दंगल भडकवल्याप्रकरणी अटक, तुरुंगात रवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो : अ‍रविंद केजरीवालसह आपचे आमदार अखिलेश त्रिपाठी. )
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) आमदार अखिलेश त्रिपाठींना दंगल आणि मारहाण प्रकरणी आज (गुरुवार) अटक करण्‍यात आली. स्थानिक न्यायालयाने त्रिपाठींना दोन दिवशांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांच्यावर आठ खटले चालू आहे. त्रिपाठी हे दिल्लीच्या मॉडल टाऊन विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.
दरम्यान आमदार अलका लांबा यांच्यावर टिप्पणी करणारे भाजपचे आमदार ओ. पी. शर्मा यांना हिवाळी अधिवेशासाठी निलंबित करण्यात आले आहे.
आमदाराला अटक का झाली?
बुराडीमधील लोकांना दंगलीसाठी भडकवल्या प्रकरणी वेगवेगळ्या कलमांतर्गत अखिलेश त्रिपाठींवर खटले चालू आहे. या प्रकरणी त्यांना अनेकदा न्यायालयात सुनावणीसाठी बोलवले गेले. मात्र त्रिपाठी एकदाही न्यायालयात हजर झाले नाही. गुरुवारी जेव्हा ते न्यायालयात आले, तर न्यायाधीशांनी त्यांना अटक करण्‍याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांची तुरुंगात रवानगी केली केली.