आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृद्धाच्या श्रीमुखात लगावणाऱ्या MLA ला पोलिसांनी पत्रकार परिषदेतून उचलले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महिलांसोबत गैरवर्तन आणि ज्येष्ठ नागरिकाला थप्पड लगावण्याचा आरोप असलेल्या आम आदमी पार्टीचे आमदार दिनेश मोहनिया यांना शनिवारी दुपारी पोलिसांनी पत्रकार परिषद सुरु असतना अटक केली. मोहनिया यांनी ही पोलिसांची दादागिरी असल्याचे म्हटले.
काय आहे प्रकरण
- अटकेच्या वेळी दिनेश मोहनिया म्हणाले, 'ही पोलिसांची गुंडगिरी आहे. भाजप एम.एम.खान यांच्या हत्याकांडावरुन लक्ष विचलित करण्यासाठी असे करत आहे.'
- मोहनिया यांच्यावर दोन दिवसांमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
- मोहनिया यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपासंदर्भात ते पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
काय आहे आरोप
- तुघलकाबाद येथील ज्येष्ठ नागरिक राकेश यांचा आरोप आहे, की शुक्रवारी ते जेव्हा पाण्याची समस्या सांगण्यासाठी त्यांच्याकडे गेले होते, तेव्हा मोहनिया यांनी त्यांना जोरदार थप्पड लगावली.
- राकेश यांचा आरोप आहे, की आमदारांसोबत असलेल्या लोकांनी त्यांचा हात मोडला.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, महिलेने कोणता आरोप केला...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...