आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाभाच्या पदाचा वाद: AAP MLAचे दोन रुमचे घर, म्हणाले- हे आहे ऑफिस ऑफ प्रॉफिट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमदार प्रवीण कुमार त्यांच्या चार मित्रांसह दोन रुमच्या फ्लॅटमध्ये असे राहातात. - Divya Marathi
आमदार प्रवीण कुमार त्यांच्या चार मित्रांसह दोन रुमच्या फ्लॅटमध्ये असे राहातात.
नवी दिल्ली - आम आदमी पार्टी च्या 21 आमदारांना संसदीय सचिवपदी नियुक्त केल्यानंतर उठलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे आमदार प्रवीण कुमार यांनी मीडियाला त्यांचे घर दाखवत म्हटले, हे आहे माझे ऑफिस ऑफ प्रॉफिट. आमदार प्रवीण कुमार ज्या घरात राहातात तिथे दोन रुम आहेत. या दोन्ही रुममध्ये ना एसी आहे ना वॉटर कुलर. प्रवीण कुमार म्हणाले, या दोन रुमच्या घरातील एका रुममध्ये माझे ऑफिस आहे आणि दुसऱ्या रुममध्ये चार मित्रांसोबत मी राहातो. आम्ही सर्वजण जमीनीवर झोपतो. भाजपला लक्ष्य करताना ते म्हणाले, त्यांच्या नेत्यांनी येऊन पाहावे माझे ऑफिस ऑफ प्रॉफिट.
कुठे आहे आमदार प्रवीण कुमार यांचे ऑफस आणि काय आहे तिथे
- 29 वर्षांचे आमदार प्रवीण कुमार जंगपुरा येथे दोन रुमच्या घरात राहातात. हे घरही त्यांचे स्वतःचे नाही तर, त्यासाठी दरमहा 10 हजार भाडे द्यावे लागते. त्यांच्यासोबत येथे त्यांचे चार मित्र देखील राहातात.
- प्रवीण कुमार दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. मीडियाला आपले घर दाखवताना ते म्हणाले, मी या फ्लॅटमध्ये चार मित्रांसोबत राहातो. आम्ही एका रुममध्ये ऑफिस केले आहे तर दुसऱ्या रुममध्ये आम्ही सर्वजण जमीनीवर झोपतो. भाजप नेत्यांनी माझे ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि फॅन्सी बंगलो पाहिला पाहिजे.
- 24 जून रोजी दिल्ली सरकारने ज्या 21 आमदारांची संसदीय सचिवपदी नियुक्ती केली आहे त्यापैकी प्रवीणकुमार एक आहेत. त्यांची शिक्षण मंत्रालयाच्या संसदीय सचिवपदी निवड झाली आहे.
काय आहे वाद
केजरीवाल यांनी 13 मार्च 2015 रोजी 21 आमदारांना संसदीय सचिवपदी नियुक्ती करत असल्याचे आदेश काढले होते. त्याला वैधानिक आधार देण्यासाठी एक विधेयक केंद्राकडे पाठवले. केंद्राने त्यावर शेरा देऊन ते राष्ट्रपतींच्या मंजुरीकडे पाठवले होते. राष्ट्रपतींनी त्याचा अभ्यास करून त्यास मंजुरी नाकारली. विधेयकात आप सरकारने संसदीय सचिवपदी नियुक्त आमदारांना लाभाच्या पदावरून अपात्र ठरवण्याच्या तरतुदीस वगळण्याचा मुद्दा होता.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, केजरीवालांनी कसा साधला BJP वर निशाणा