आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपचे आमदार वेद प्रकाश यांच्‍यावर अज्ञात हल्‍लेखाेरांकडून गोळीबार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सत्ताधारी आम आदमी पक्षाचे आमदार वेद प्रकाश यांच्यावर शुक्रवारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या हल्ल्यातून प्रकाश बचावले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दिल्ली विधानसभेमध्‍ये बवाना मतदारसंघातून निवडून आलेले आमदार वेद प्रकाश त्यांच्या ईश्वर कॉलनी येथील कार्यालयाबाहेर होते, तेव्‍हा अज्ञान हल्‍लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
काही समाजकंटकांनी आमदार वेद प्रकाश यांच्यावर शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हल्ला केला अशी माहिती एका अधिका-याकडून मिळाली आहे.