आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aap Mla Vinodkumar Binny Sounds Revolt, Accuses Kejriwal Of Misleading People

\'आप\'च्या बिन्नींची पुन्हा बंडखोरीची भाषा, माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या, नाहीतर...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आम आदमी पक्षाला पुन्हा एकदा बंडखोरीचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे. लक्ष्मीनगरमधील आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी पुन्हा एकदा बंडखोरीची भाषा सुरु केली आहे. बिन्नी यांनी म्हटले आहे, की आम्ही जनतेला दिलेल्या आश्वासनापासून आता दूर चाललो आहेत. आमच्या पक्षातील लोकांत कथनी आणि करनीमध्ये फरक आहे. पक्षाने जनतेसमोर जे मुद्दे मांडले होते त्याच्यापासून दूर चाललो आहोत व दुसरेच मुद्दे पक्षाच्या अजेंड्यावर येत आहेत. गुरुवारी सकाळी 11 वाजता मी पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका मांडणार आहे. बिन्नी यांनी इशारा देताना सांगितले, की केजरीवाल यांनी जर जनहिताचे निर्णय घेतले नाही किंवा माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तर मी उपोषणाला बसणार आहे.
बिन्नींनी म्हटले आहेत, की पक्षात आता बंद खोलीत निर्णय होऊ लागले आहेत. हे योग्य नाही. मी आपसोबत मुद्यांच्या व विचारधारेच्या आधारावर जोडलो गेलो आहे. कोणा एका व्यक्तीकेंद्रित राजकारणावर माझा विश्वास नाही. जे मुद्दे घेऊन हा पक्ष स्थापन झाला होता आता तो त्यापासून दूर जावू लागला आहे. त्यामुळेच पहिल्या दिवशीही नाराज झालो होतो.
पहिल्यांदा नाराज झाल्याबाबत बिन्नींनी सांगितले, की मी आपमध्ये आमदार किंवा मंत्री बनण्यासाठी आलो नाही. मी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आलो आहे. मंत्रीपद मिळाले नसल्याने तुम्ही केजरीवाल व पक्षांवर नाराज असल्याची चर्चा आहे, यावर बोलताना बिन्नी म्हणाले, मी स्वत: मंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. जेव्हा उपराज्यपालांना संभाव्य मंत्र्यांची यादी पाठविली गेली होती तेव्हा त्यात माझे नाव होते. मात्र मी त्यास ठाम नकार दिला व माझे नाव मागे घेण्यास सांगितले. कारण मी आपसोबत मुद्यांच्या आधारावर जोडलो गेलो आहे. मी येथे मंत्रीपद मिळविण्यासाठी आलो नाही. केजरीवाल सरकार मूळ मुद्द्यांपासून भटकत आहे. तसेच केजरीवाल यांनी माझ्या काही प्रश्नांचे उत्तरे द्यायला हवीत. नाहीतर मी उपोषणाला बसणार आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षाने बिन्नी यांच्या बंडखोरीबाबत सावध भूमिका घेतली आहे. आपमध्ये वैयक्तिक महत्त्वकांक्षेला कोणतेही स्थान नाही, असे सांगत बिन्नीवर अधिक बोलण्यास नकार दिला आहे. बिन्नी लोकसभेच्या तिकीटासाठी दबाव वाढवत असल्याची चर्चा आहे.