आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आप’ला ‘खास’ होण्याचे वेध; दिल्लीच्या आमदारांना हवी पगार वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली – कॉमन मॅनचा पक्ष म्‍हणून मिरवणा-या आम आदमी पक्षाच्‍या (आप) आमदारांनाही खास होण्‍याचे वेध लागले असून, त्‍यांनी आपल्‍या पगारात वाढ करण्‍याची मागणी केली आहे. मात्र, याला भाजपच्‍या आमदारांनी विरोध करत केवळ एक रुपया मासिक मानधानाचा प्रस्‍ताव आणणार असल्‍याचे सांगितले.
‘आप’ च्‍या 21 आमदारांनी मासिक पगार वाढीची मागणी केली आहे. अनेक आमदारांना स्‍वत:चे घर नाही; तर काहींचे घर छोटे आहे. परिणामी, नागरिकांच्‍या समस्‍या सोडवण्‍यासाठी अडचण येत आहे. त्‍यामुळे पगारवाढ मागत असल्‍याचा युक्‍तीवाद त्‍यांनी केला. दरम्‍यान, जर मुख्‍यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी हा प्रस्‍ताव मान्‍य केला तर आपण मासिक 1 रुपया वेतनाचा प्रस्‍ताव मांडू, असा पलटवार भाजपच्‍या आमदारांनी केला.
पगार वाढीचा विचार नाहीच
या बाबत दिल्‍ली शासनाकडून स्‍पष्‍ट करण्‍यात आले की, आमदारांनी पगार वाढीची मागणी केली आहे; पण शासनाने अद्याप याचा विचारच केलेला नाही.