आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AAP News In Marathi, Arvind Kejriwal, Divya Marathi

महाराष्ट्रात निवडणुका लढण्याचा ‘आप’ करणार फेरविचार, कार्यकर्त्यांचा आग्रह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला महाराष्ट्रात सपाटून मार खावा लागला होता. त्यानंतर खडबडूज जागे झालेल्या पक्षनेतृत्वाने आता दिल्लीशिवाय कुठेही निवडणूक न लढविण्‍याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीची ‘हालगी’ वाजू लागताच महाराष्ट्र व हरियाणातील विधानसभेच्या निवडणुका लढविण्‍याबाबत पक्षाच्या पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणुका लढण्याचा निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.

दिल्ली विधानसभा नविडणुकीमध्ये 70 पैकी 28 जागा प्राप्त केल्यानंतर आम आदमी पार्टीने लोकसभा नविडणुकांच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात उमेदवार उभे केले. परंतु अरविंद केजरीवाल, योगेंद्र यादव, कुमार वशि्वास, आशुतोष यांच्यासह सर्वच दगि्गजांना मोदी लाटेने आडवे केले. पंजाबमधील चार जागा वगळता आम आदमी पार्टीला इतर ठिकाणी एकही जागा मिळवता आली नाही. दिल्लीत लोकसभेची एकही जागा घेतली नसली तरी दुस-या क्रमांकाची मते मिळवणि्यात या पार्टीला यश मिळाले.

लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर आम्ही केवळ दिल्लीकडे लक्ष केंद्रीत करू, अन्य कोणत्याही राज्यातील विधानसभेच्या नविडणुका लढणार नाही अशी अरविंद केजरीवाल यांनी केली होती. मात्र ‘लोकसभेच्या निकालाचा एवढा धसका घेऊन चालणार नाही, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या नविडणुकांमध्ये संपूर्ण शक्तीनिशी उतरावे, असा सूर ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी लावला आहे. मात्र ज्यांच्यात जिंकण्याची क्षमता आहे, अशाच ठिकाणी उमेदवार द्यावेत, असा आग्रही धरला जात आहे.

कार्यकर्त्यांच्या या मागणीवर आम आदमी पार्टी पुनर्विचार करीत असल्याची सुत्राने माहिती दिली. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
पुन्हा उभारीची आशा
विधानसभेच्या नविडणुकांमध्ये आम आदमी पार्टीने उतरल्यास पक्षा नव्या दमाने पुन्हा काही राज्यांत नावारुपास येऊ शकतो, असा वशि्वास पार्टीच्या कार्यकर्त्यांना वाटतो. मोदी लाट आता संपली असून त्यांनी केलेल्या घोषणा पोकळ असल्याबाबत लोक बोलायला लागले असल्याबाबतही पदाधिका-यांच्या चर्चेतील सूर आहे.

दमानिया, गांधींचे नेतृत्व : महाराष्ट्रात अंजली दमानिया किंवा मयंक गांधी यांच्या नेतृत्वात नविडणूक लढविली जाईल. नविडणुकींचा प्रचार हा भ्रष्टाचारावरच केंद्रीत राहणार आहे. तर हरियाणामध्ये योगेंद्र यादव यांना नेतृत्व दिल्या जाईल.