आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AAP Not Provide Foreign Fund Information, Centre Said In Delhi High Court

'आप' परदेशी निधीची माहिती देत नाही, केंद्राची दिल्ली उच्च न्यायालयात माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - परदेशातून मिळालेल्या निधीबद्दल आम आदमी पार्टी (आप)चे गौडबंगाल कायम असून यासंबंधी पक्ष तपशीलवार माहिती पक्ष देत नाही असे शपथपत्र केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात दिले आहे. दोन महिन्यांपूर्वी आपकडून परदेशी निधीबाबत तपशीलवार माहिती मागवण्यात आली होती. केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयास ही माहिती दिली.
अतिरिक्त महाधिवक्ता राजीव मेहरा यांनी गृहमंत्रालयातर्फे उच्च न्यायालयात बाजू मांडली.न्यायमूर्ती प्रदीप नादरजोग यांच्यासमोर ही सुनावणी झाली. चार नोव्हेंबर 2013 रोजी गृहमंत्रालयाने आपला पत्र पाठवले होते.या पत्रात आपकडून पक्षाचे बँक खाते व इतर माहिती मागवली होती. ही माहिती निधीबद्दल होती.यानंतर पुन्हा स्मरणपत्र पाठवण्यात आले.त्याचे अद्याप उत्तर मिळालेले नाही. असे मेहरा यांनी न्यायालयास सांगितले. याप्रकरणी पाच फे ब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
याचिकेतील आरोप
1. आप नेते अरविंद केजरीवाल,मनीष सिसोदिया, शांतिभूषण आणि प्रशांत भूषण यांनी नियमांची पायमल्ली करून परदेशी निधी जमवला. 2. दिल्ली विधानसभा निवडणूकीत अमेरिकेतील एका कॉल सेंटरमार्फत पक्षाचा प्रचार सुरु होता.हे सुध्दा नियमांच्या विरुध्द आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा बरखा सिंग यांची उचलबांगडी?
अफ्रिकन महिलाच्या छेडछाड प्रकरणी कायदामंत्री सोमनाथ भारती यांना दोन वेळा समन्स बजावणा-या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष बरखा सिंग यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे. आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रसिद्ध हिंदी कादंबरीकार मैत्रेयी पुष्पा यांच्या नावाचा प्रस्ताव नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याकडे पाठवला आहे. कायदामंत्री सोमनाथ भारती यांनी मध्यरात्री आफ्रिकी महिलांच्या घरावर धाड टाकल्याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्ष बरखा सिंग राजकीय रंग देत असल्याचा आरोप ‘आप’ने केला. यानंतर सरकारकडून नव्या अध्यक्षाच्या नावाचा प्रस्ताव पुढे आला आहे.