नवी दिल्ली- देशाची राजधानी असलेल्या 'दिल्ली'त आम आदमी पक्ष (आप) कॉंग्रेसने बाहेरुन दिलेल्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करत आहे. 'आप' जनतेच्या इच्छेनुरुप काम करेल, परंतु आमचे सरकार किती दिवस टिकेल हे सांगणे अवघड असल्याचे मत पक्षाचे नेते प्रशांत भूषण यांनी व्यक्त केले आहे.
भूषण म्हणाले, 'आप' कोणच्याही दबावाला बळी न पडला स्वत:चे धोरण राबवून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार आहे. मात्र, आपचे सरकार पाडण्यासाठी कॉंग्रेस काहीही करू शकते. कॉंग्रेस वेळ पडल्यास भाजपसोबतही हात मिळवू शकते. यामुळे 'आप'चे सरकार किती काळ टिकेल, हे सांगणे अशक्य आहे.
'आप'ला सरकार स्थापनेसाठी जनमताने कौल दिला आहे. आमचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचेही भूषण यांनी सांगितले आहे..
दुसरीकडे, दिल्लीतील जनता खोट्या आश्वासनांना भूलली आहे. 'आप' ही आश्वासने कितपत पूर्ण करेल, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार असल्याचे माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित म्हणाल्या.
पुढील स्लाईड्वर वाचा, केजरीवाल होणार दिल्लीचे मुख्यमंत्री...