नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाचे नाव आज बदलण्यात आले आहे. '7 रेसकोर्स रोड' या ऐवजी आता '7 लोककल्याण मार्ग' असे पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे नामकरण करण्यात आले आहे. भाजप खासदार मिनाक्षी लेखी यांनी नवी दिल्ली नगर परिषदेकडे (एनडीएमसी) नाव बदलण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
'7 रेसकोर्स रोड' हे नाव भारताच्या संस्कृतीशी सुसंगत वाटत नाही असे, मिनाक्षी यांचे मत होते. लेखी यांनी प्रस्तावात म्हटले होते की, हे नाव बदलून ‘7 एकात्म मार्ग’ असे करण्यात यावे. या प्रस्तावाला एनडीएमसीने मान्यता देत निवासस्थानाला '7 लोककल्याण मार्ग' असे नाव दिले.
केजरीवाल म्हणाले..
रेसकोर्स रोडचे नामांतर करण्यासाठी बुधवारी महापालिकेची बैठक झाली. या बैठकीत अनेक नावांबाबतचे प्रस्ताव आले. मात्र, लोककल्याण या नावावर सर्वांनी सहमती दर्शवली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानाचे फोटो..